Maharashtra Govt announces toll-free travel for electric vehicles on three highways to promote green mobility. Saam tv
महाराष्ट्र

Toll Free: केंद्रानंतर राज्य सरकारनं दिली खुशखबर; आता 100 टक्के टोलमाफी, सरकारचा मोठा निर्णय

Maharashtra Govt Announces Electric Vehicles Toll Free: महाराष्ट्र सरकारने तीन महामार्गांवरील इलेक्ट्रिक वाहनांना १००% टोलमाफी जाहीर केली आहे. मोटार वाहन कायदा १९५८ अंतर्गत घेतलेल्या या निर्णयाचा उद्देश इलेक्ट्रिक वाहनांचा अवलंब वाढवणे आणि प्रवास खर्च कमी करणे आहे.

Bharat Jadhav

  • महाराष्ट्र सरकारने इलेक्ट्रिक वाहनांसाठी १००% टोलमाफी जाहीर केली.

  • राज्यातील तीन महामार्गांवर हा निर्णय लागू होणार आहे.

  • मोटार व्हेइकल अॅक्ट 1958 अंतर्गत टोलमाफीची घोषणा करण्यात आली.

जीएसटीमध्ये सुधारणा करत केंद्र सरकारने सर्वसामन्य लोकांची दिवाळी गोड केली. केंद्र पाठोपाठ राज्यानं देखील खूशखबर दिलीय. महाराष्ट्र सरकारने राज्यातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी मोठा निर्णय घेतलाय. सरकारने राज्यातील ३ महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांसाठी टोलमाफी केलीय. मोटार व्हेइकल अॅक्ट 1958 अंतर्गत सरकारने हा निर्णय घेण्यात आलाय.

राज्यातील तीन महामार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल लागणार नाहीये. वाहनधारकांना एकही रुपया द्यावा लागणार नाहीये. इलेक्ट्रिक वाहनधारकांनी या निर्णयाचे स्वागत केलंय. राज्याचे परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी बाबत माहिती दिलीय. सरकारच्या या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन असणाऱ्यांना प्रवास स्वस्त होणार आहे. या निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदीला चालना मिळणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात येत आहे.

टोलमाफीच्या निर्णयाअंतर्गत M2, M3 आणि M6 श्रेणीच्या चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना तसेच राज्य परिवहन महामंडळ (STU) आणि खासगी कंपन्यांच्या इलेक्ट्रिक बसेसला टोलमाफी लागू असणार आहे. या निर्णयामुळे पर्यावरणपुरक वाहनांतही वाढ होण्याची शक्यता सरकारने व्यक्त केलीय. तसेच या निर्णयामुले आता इलेक्ट्रिक वाहनधारकांचे हजारो रुपये वाचणार आहेत.

इलेक्ट्रिक वाहन वापरण्याचे अनेक फायदे आहेत. सर्वात महत्त्वाचे या वाहनांमुळे प्रदूषण कमी होते. इंधनाचा खर्चही कमी होत आहे. सर्वसामान्य वाहनांना चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेलची गरज असते. तर दुसरीकडे इलेक्ट्रिक वाहनांना मात्र पेट्रोल, डिझेलची गरज नसते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Local Train: मुंबई लोकलचा ४ दिवस रेल्वे ब्लॉक, अनेक ट्रेन रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

Ganeshotsav: पुण्यात आता ‘नो लिमिट’, विसर्जन मिरवणुकीत होणार ढोल-ताशांचा जल्लोष, पथकांवरची सक्ती हटली

Friday Horoscope : कामाच्या ठिकाणी धावपळ होणार; 3 राशींच्या लोकांना आव्हाने पेलावे लागणार

Panvel Crime News: मुलीच्या गळ्यावर कोयता, पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला; जामीनावरील आरोपीचा पनवेलमध्ये धुडगूस

Eknath Shinde : उपमुख्यमंत्री नाराज असल्यावर दरेगावी जातात? विरोधकांच्या आरोपांना एकनाथ शिंदेंचं थेट उत्तर, म्हणाले...

SCROLL FOR NEXT