LPG Shortage Saam Tv
महाराष्ट्र

LPG Shortage: सरकारचा मोठा निर्णय, आता प्रत्येक कुटुंबाला मिळणार ३ लिटर रॉकेल

Government Big Decision for Ration Cardholders get Kerosene: रेशन कार्डधारकांना आता केरोसीन दिले जाणार आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Ganesh Kavade

युद्धाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

आता रेशनकार्डधारकांना मिळणार केरोसीन

रेशनकार्डधारकांना मिळणार ३ लिटर पेट्रोल

आखाती देशांमध्ये सुरु असणाऱ्या युद्धाचा जगावर परिणाम होत आहे. यामुळे इंधनाचा आणि एलपीजी गॅसचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. युद्धाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.सध्या एलपीजी गॅसच्या किंमती वाढल्या आहेत, तसेच एलपीजी गॅस बुकिंगचा कालावधी वाढला आहे त्यामुळे नागरिकांना खूप वाट पाहावी लागते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठं पाऊल उचलले आहे.

केंद्र सरकारचा मोठा निर्णय (Central Government to Distribute Kerosene)

केंद्र सरकारकडून ३७ लाख ४४ हजार लिटर केरोसीनच्या वाटपाला मंजुरी दिली आहे. राज्यातील नागरिकांना केरोसीन वापरण्यास परवानगी मिळाली आहे. आता रेशन कार्डधारकांना केरोसीन मिळणार आहे. केरोसीनचा वापर करुन स्टोव्हवर जेवण बनवू शकता, या उद्देशाने हा निर्णय ङेतला आहे.

एलपीजी गॅस तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तात्पुरत्या स्वरुपात केरोसीन वाटप केले जाणार आहे. राज्य सरकारकडून जिल्हानिहाय केरोसीन वितरण निश्चित करण्यात आले आहे.

मार्च एप्रिल २०२६ मध्ये केरोसीन वाटप राज्यात तिन्ही तेल कंपन्यांकडून केले जाणार आहे. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियम या कंपन्यांद्वारे केरोसीन दिले जाणार आहे. एकूण वाटपाच्या ८५ टक्के केरोसीन पहिल्या पंधरा दिवसात सोडण्याचे राज्य सरकारचे आदेश आहेत.

शिधापत्रिका असलेल्या ३ लिटर केरोसीन मिळणार आहे. त्याचसोबत ज्या कुटुंबाकडे शिधापत्रिका नाही अशा कुटुंबांनादेखील केरोसीन मिळणार आहे. प्रतिसादाच्या अनुषंगाने श्वेतपत्रिकाधारक केरोसीन मिळवण्यासाठी पात्र असतील.

प्रत्येक जिल्ह्यात केरोसीन पाठवले जाणार आहे. त्यानंतर ते नागरिकांपर्यंत पुरवले जाणार आहे. हिंगोली जिल्ह्यात केरोसीन दाखलदेखील झाले आहे. हे केरोसीन शिधापत्रिकाधारकांमध्ये वाटण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

Maharashtra News Live Update: येत्या तीन वर्षांत वन खात्यात २५ ते ३० हजार लोकांची भरती होणार!

Gokul Election : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान! सत्तेचा फैसला कोणाच्या बाजूने?

Maharashtra Weather : दसऱ्यापूर्वी मुसळधार पावसाची शक्यता, सोलापूरसह १४ जिल्ह्यांना झोडपून काढणार, IMD चा येलो अलर्ट

SCROLL FOR NEXT