Ration Card: टेन्शन देणार बातमी! या नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे बंद; मिळणार नाही लाभ; तुमचंही नाव आहे का?

Ration Card Update: रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता काही नागरिकांचे रेशन कार्ड कायमचे बंद झाले आहेत. यामागे अनेक कारणे आहेत. तुमचंही रेशन कार्ड बंद झालंय का ते जाणून घ्या.
Ration Card
Ration CardSaam Tv
Published On
Summary

रेशन कार्डबाबत महत्त्वाची अपडेट

या नागरिकांचे रेशन कार्ड होणार बंद

मिळणार नाही मोफत अन्नधान्य

रेशन कार्ड हे महत्त्वाचे कागदपत्र आहे. रेशन कार्डद्वारे लाभार्थ्यांना दर महिन्याला ५ किलोपर्यंत अन्नधान्य मोफत मिळते. अनेकजण दर महिन्याला लाभ घेतात. अनेकजण हे अन्नधान्य घेत नाही. सोलापूरातील तब्बल २२८०० लाभार्थ्यांनी वर्षभर धान्यच घेतले नाही. त्यामुळेच पुरवठा निरीक्षक आणि तलाठ्यांमार्फत मिशन पडताळणी सुरु केली आहे.

Ration Card
LIC New Scheme: नवीन वर्षात LIC चं मोठं गिफ्ट, नवी योजना केली लाँच; मिळणार आयुष्यभराचा विमा

रेशन कार्ड बंद होण्याची कारणे

या रेशन कार्डधारकांपैकी अनेकांनी आर्थिक स्थिती सुधारली आहे त्यांना या धान्याची गरज नाही. अनेकजण स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे या महिलांना लाभाची गरज नाही. या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे.

रेशन कार्ड आणि आधार कार्ड अनिवार्य करण्यास सांगितले होते. त्यावेळी रेशन दुकानदारांनी अंदाजे जन्मतारीख टाकली होते. त्यामुळे अनेकांचे वय खूप जास्त दाखवत होते तर काहींचे वय १८ पेक्षा कमी असल्याचे दाखवत आहे. याचीही पडताळणी केली जाणार आहे. या गोंधळामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

Ration Card
Post Office Scheme : एक लाख गुंतवा अन् व्याजातून ₹४४,९९५ मिळवा; पोस्टाच्या भन्नाट योजनेचं कॅल्क्युलेशन वाचा

याचसोबत अनेक लाभार्थी स्थलांतिक झाले आहेत. त्यातील काही लोकांनी पत्ते बदलले आहेत त्यामुळे त्यांचा लाभ बंद होणार आहे. ज्या रेशनकार्डधारकांनी सहा ते १२ महिन्यांपासून योजनेचा लाभ घेतला नाही अशा लोकांची पडताळणी केली जाणार आहेत. यातील अपात्र लाभार्थ्यांचे रेशन कार्ड कायमचे बंद केले जाणार आहे.

Ration Card
Ladki Bahin Yojana eKYC: २० लाख लाडक्या बहि‍णींचे ₹१५०० कायमचे बंद, ईकेवायसीबाबत महत्त्वाची अपडेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com