LIC New Scheme: नवीन वर्षात LIC चं मोठं गिफ्ट, नवी योजना केली लाँच; मिळणार आयुष्यभराचा विमा

LIC Jeevan Utsav Saving Scheme: एलआयसीने जीवन उत्सव सिंगल प्रीमियम स्कीम सुरु केली आहे. ही योजना याआधीदेखील सुरु होती. परंतु काही कारणांनी योजना बंद करण्यात आली. त्यानंतर ही योजना पुन्हा सुरु झाली आहे.
LIC Scheme
LIC SchemeSaam tv
Published On
Summary

LIC ची नवी जीवन उत्सव सिंगल प्रिमियम स्कीम

बंद झालेली योजना पुन्हा सुरु केली

एकदाच प्रीमियम भरा अन् आयुष्यभरासाठी वीमा मिळवा

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीच्या प्रत्येक योजनेत तुम्हाला सुरक्षित परतावा मिळतो. एलआयसीने २०२६ या नवीन वर्षातील पहिली योजना लाँच केली. एलआयसीने त्यांची बंद झालेली पॉलिसी पुन्हा सुरु केली आहे.यामुळे आता ग्राहकांना नवीन योजनेत गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे.

LIC Scheme
LIC Saral Pension: LIC ची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् दर महिन्याला १२००० रुपयांची पेन्शन मिळवा

एलआयसी कंपनीने LIC जीवन उत्सव सिंगल प्रिमियम स्कीम सुरु केली आहे. ही योजना १२ जानेवारीपासून सुरु होणार आहे. ही एक नॉन लिंक्ड आणि नॉन क्रॉस विमा योजना आहे. या योजनेत तुम्हाला सेविंगसोबतच पूर्ण आयुष्याचा कव्हर मिळतो. यासाठी तुम्हाला फक्त एकदाच प्रिमियम भरावा लागणार आहे.

एलआयसी सिंगल उत्सव प्रिमियम स्कीमबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या योजनेच्या अटींबाबतही अद्याप माहिती समोर आलेली नाही. परंतु या योजनेत सिंग प्रिमियम भरल्यावर आयुष्यभर विमा कव्हर मिळणार आहे.

मागच्या वर्षी एलयासीने अनेक योजना सुरु केली होती. यामध्ये एलआयसी प्रोटीन प्लस, एलआयसी विमा कवच, एलआयसी जन सुरक्षा प्लान, एलआयसी विमा लक्ष्मी योजना सुरु केली. याचसोबत एलआयसी स्मार्ट पेन्शन प्लान योजनादेखील लाँच केली होती. त्याचसोबत ही योजना सुरु केली होती. दरम्यान, ही योजना बंद करण्यात आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा एलआयसी जीवन उत्सव योजना सुरु केली आहे.

एलआयसीने पॉलिसीधाकांसाठी विशेष रिवाइवल अभियान सुरु केले आहे. ज्यामध्ये ज्या पॉलिसीधारकांना एखाद्या योजनेत प्रिमियम भरलेत आणि ती योजना बंद झाली आहे. ती योजना परत सुरु करण्याचे काम केले जाणार आहे. हे अभियान १ जानेवारी २०२६ पासून ते २ मार्च २०२६ पर्यंत सुरु राहणार आहे. यामधील नॉन लिंक्ड आणि मायक्रो इन्श्युरन्स प्लान पुन्हा सुरु केला जाणार आहे. यामध्ये पॉलिसीधारकांना लेट फीमध्ये सूट दिली जाणार आहे.

LIC Scheme
Saving Scheme Interest Rate: कामाची बातमी! PPF, सुकन्या समृद्धीसह बचत योजनेचे नवीन व्याजदर जाहीर; वाचा सविस्तर

एलआयसीच्या मते, लेट फीवर ३० टक्के सूट मिळणार आहे. जास्तीत जास्त ५००० रुपयांची सूट दिली जाणार आहे. यामध्ये मेडिकल संबंधित काही अटी नसणार आहेत. तुम्हाला एकदा पॉलिसीमध्ये प्रिमियम भरायचा आहे त्यानंतर ५ वर्षांच्या आतमध्ये हे पुन्हा रिवाइज केले जाणार आहे.

LIC Scheme
LIC Smart Pension Scheme : एलआयसीची भन्नाट स्कीम, प्रत्येक महिन्याला मिळणार ₹२०,००० पेन्शन; कॅल्क्युलेशन वाचा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com