Maharashtra Political News Saam tv
महाराष्ट्र

नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा; फडणवीस सरकारकडून शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फी माफी, कुठल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?

Maharashtra Politics : फडणवीस सरकारने नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा केलीये. फडणवीस सरकारकडून पूरग्रस्त भागातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फी माफ केलीये.

Vishal Gangurde

महाराष्ट्र सरकारकडून नुकसानग्रस्तांसाठी ३२,००० कोटींची मदत

राज्यातील २५३ तालुक्यांतील शाळा आणि कॉलेज विद्यार्थ्यांना फी माफी

शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत

पिकविम्यासाठी किमान ५,००० कोटींचं वाटप जाहीर केलंय

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. सरकारमधील तिन्ही प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत शेतकऱ्यांसाठी ३२ हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं आहे. सरकारकडून दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत देण्याचा मानस असणार आहे. यावेळी मुख्यमंत्री फडणवीसांनी शाळा आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा दिला आहे. सरकारने राज्यातील २५३ तालुक्यातील शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फी माफीची घोषणा केली आहे.

फडणवीस सरकारच्या कॅबिनेटची आज मंगळवारी बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत महायुती सरकारने मोठी घोषणा केली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. आम्ही जाऊन पाहणी देखील केली. आता तत्काळ मदत म्हणून १० हजार रुपये आणि गहू-तांदूळ देण्यात आले आहेत. शेतकरी पायावर उभा राहिला पाहिजे. पडलेली घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद करण्यात आली आहे. डोंगरी भागातील घरांना दहा हजार अधिकची मदत जाहीर करण्यात आलीये'.

'नुकसान झालेल्या प्रत्येक घटकाला मदतीची तरतूद करण्यात आली आहे. NDRFचे निकष काही प्रमाणात काढून टाकले आहेत. 47 हजार एकरी खरवडून गेलेल्या जमिनींना प्रति विहीर 30 हजार रुपये जाहीर करण्यात आलीये. पडलेली घरे बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून तरतूद करण्यात आली आहे. डोंगरी भागातील घरांना दहा हजार अधिकची मदत देण्यात आली आहे. थेट मदत 6175 कोटी रुपये देण्यात येईल. रब्बी पिकांसाठी बियाणे अतिरिक्त प्रति हेक्टरी 6175 कोटी देण्यात येईल, असे ते म्हणाले.

'विमा असलेल्या 45 लाख शेतकऱ्यांना 17 हजार हेक्टरी मदत देण्यात येईल. कोरडवाहू शेतकऱ्यांना 35 हजार तर बागायतीला 50 हजार रुपयांपर्यंत मदत मिळेल. पीकविमा किमान पाच हजार कोटी देण्यात येईल, अशीही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्य सरकारने एकूण पूरग्रस्त भागासाठी ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: भाजपचा शरद पवार आणि काँग्रेसला दणका; आमदाराच्या मुलासह बड्या नेत्यांनी हाती घेतलं कमळ

Amboli Tourism : 'आंबोली'ला गेल्यावर काय काय पाहाल? पटकन नोट करा सुंदर ठिकाणांची नावे

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणीला दिवाळीचा हप्ता कधी येणार?

Wednesday Horoscope : व्यवसायात नवीन भागीदारी टाळा; बँकतील नोकरदारांसाठी तणावाचा दिवस, वाचा बुधवारचे राशीभविष्य

Crime News : डिलिव्हरी बॉक्स अन् बनावट बारकोड; कंपन्यांची लाखोंची फसवणूक करणाऱ्यांचं हरियाणा कनेक्शन उघड

SCROLL FOR NEXT