CJI Bhushan Gawai : सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकणारा कोण आहे? वकिलाची कुंडली आली समोर

CJI Bhushan Gawai News : सरन्यायाधीश भुषण गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाची कुंडली समोर आलीये. वकिलाने बुट फेकण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे.
Bhushan Gawai News
CJI Bhushan Gawai NewsSaam tv
Published On
Summary

सरन्यायाधीश भूषण गवईंवर बूट फेकण्याचा प्रयत्न.

आरोपी वकील राकेश किशोर याचे वय ६०

अचानक घडलेल्या या घटनेमुळे वातावरण तणावपूर्ण.

आरोपीविरोधात कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती मिळत आहे

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर बुट फेकण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने क्षणभरात खळबळ उडाली आहे. सरन्यायाधीशांवर बुट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाची संपूर्ण कुंडली समोर आली आहे.

राकेश किशोर असे सरन्यायाधीशांवर बुट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकिलाचे नाव आहे. आरोपी राकेशचं वय हे ६० आहे. त्याने सुप्रीम कोर्टातील बार कौन्सिलमध्ये २०११ साली नोंदणी केली होती. या राकेश किशोरच्या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

कोर्टरुममध्ये नेमकं काय घडलं?

सुप्रीम कोर्टात सोमवारी एका प्रकरणाची सुनावणी सुरु होती. या सुनावणीदरम्यान वकील राकेश किशोर हे सरन्यायाधीशांजवळ पोहोचले. त्यानंतर संधी मिळताच वकील राकेशन किशोरने सरन्यायाधीश बीआर गवई यांच्या दिशेने बूट फेकला. मात्र, वकील राकेशचा बूट सरन्यायाधीश गवईंपर्यंत पोहोचला नाही. त्यानंतर त्याने ओरडत सनातनी धर्माचा अपमान सहन करणार नाही, अशी घोषणाबाजी केली.

Bhushan Gawai News
Political News : निवडणूक बिहारमध्ये अन् उलथापालथ दुसऱ्या राज्यात, थेट मुख्यमंत्री बदलणार? भाजप नेत्याचा मोठा दावा

राकेश किशोरच्या कृत्यानंतर कोर्टातील सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने वकील राकेश किशोरला ताब्यात घेतलं. या वकिलाला तातडीने कोर्टाच्या बाहेर नेण्यात आलं. राकेश किशोरच्या कृत्यावेळी सरन्यायाधीश गवई यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी कोर्टात वकिलांना सुनावणी सुरु ठेवण्याचे आदेश दिले. सरन्यायाधीश गवई यांनी वकिलांना पुढे सांगितलं की, 'तुम्ही या गोष्टीने विचलित होऊ नका. मला या गोष्टीने कोणताही फरक पडत नाही'.

Bhushan Gawai News
Cough Syrup : कफ सिरप प्रकरणानंतर महाराष्ट्रात अलर्ट; अन्न व औषध प्रशासनाने घेतला महत्वाचा निर्णय

आमदार जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, 'सनातन का अपमान नहीं सहेंगे...एक सडक्या मनोप्रवृत्तीचा सुप्रीम कोर्टातला वकील जोरजोरात ओरडतो आणि थेट माननीय मुख्य सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने चप्पल फेकतो. जेव्हा शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा महाराष्ट्रात सरन्यायाधीश आले होते, तेव्हा तर थेट राज्य सरकारने प्रोटोकॉल दिला नाही. या घटना कसल्या द्योतक आहेत. ढासळणाऱ्या मानसिकतेच्या आणि एक सनकीं डोक्याने भरलेल्या ज्वराचा...'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com