बनावट सोन्याच्या दागिन्यांवर हॉल मार्कचा शिक्का; ज्वेलर्सला गंडवणारी बंटी-बबलीची टोळी अडकली, वाचा अटकेचा थरार

Kalyan Crime News : ज्वेलर्सला गंडवणारी बंटी-बबलीची टोळी जाळ्यात अडकली आहे. टोळीचा अटकेचा थरार जाणून घ्या.
Kalyan news
Kalyan Crime Saam tv
Published On
Summary

कल्याणमध्ये बनावट सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क शिक्का मारून ज्वेलर्सची फसवणूक

अश्विनी शेवाळे आणि मयूर पाटोळे या दाम्पत्यास पोलिसांनी अटक

बनावट हॉलमार्क शिक्का पुण्यातील शरण शिलवंतने मारला होता

महात्मा फुले पोलिसांचे पथक सतर्कतेने तपास करत कारवाई

संघर्ष गांगुर्डे, साम टीव्ही

Kalyan news : चांदीच्या दागिन्यावर सोन्याचा मुलामा चढवून त्यावर हॉल मार्कचा शिक्का मारत हे दागिने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने ज्वेलर्सला बंटी बबली दाम्पत्यासह त्यांच्या एका साथीदाराने गंडा घातला. या प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. अश्विनी शेवाळे ,मयूर पाटोळे अशी बंटी बबली दाम्पत्याची नावे आहेत. तर या दोघांना नकली दागिन्यांवर हॉलमार्क मारून देणारा शरण शिलवंत या भामट्याला पुणे येथून बेड्या ठोकल्यात .

मुख्य बाजारपेठ परिसरात असलेल्या एका ज्वेलर्सला बनावट सोन्याचे दागिने, बनावट हॉलमार्क असलेले दागिने गहाण ठेवण्याच्या बहाण्याने येऊन बंटी बबलीने ज्वेलर्सला हजारोंचा गंडा घातला होता. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी या दोघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे त्यांचा शोध सुरू केला.

Kalyan news
Prime Minister Resigns : पंतप्रधानांचा अवघ्या एका महिन्यात राजीनामा; या देशात PM च्या खुर्चीवर कुणीच का टीकत नाही? कारणे काय?

पोलिसांनी याप्रकरणी ज्वेलर्स फसवणूक करणाऱ्या अश्विनी शेवाळे आणि मयूर पाटोळे या दाम्पत्याला ठाणे येथून बेड्या ठोकल्या. या दोघांनी चांदीच्या दागिन्यांवर सोन्याचा मुलांना चढवत हे दागिने सोन्याचे असलेले भासवले होते. धक्कादायक बाब म्हणजे या दागिन्यांवर हॉलमार्क शिक्का देखील होता. पोलीस तपासादरम्यान हा हॉलमार्कचा शिक्का पुणे येथील शरण शिलवंत नावाच्या इसमाने मारून दिल्याचे निष्पन्न झाले.v

Kalyan news
Two Group Clash : दुर्गा मूर्ती विसर्जनावरून दोन गटात राडा; वाहन आणि दुकानांची तोडफोड, पोलिस आयुक्तांसहित अनेक जखमी

महात्मा फुले पोलिसांच्या पथकाने तत्काळ पुणे गाठत सापळा रचत शरण शिलवंत याला बेड्या ठोकल्या. या तिघांनी अशा प्रकारे किती जणांनी फसवणूक केली आहे. याचा तपास महात्मा फुले पोलीस करत असल्याची माहिती एसीपी कल्याणजी घेटे यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com