Maharashtra Cabinet ministry Saamtv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शिंदेंची कोंडी? भाजप गृह खातं स्वत:कडेच ठेवणार, नगरविकास खात्यावरही ठोकला दावा

Maharashtra Cabinet Ministry : खातेवाटपात एकनात शिंदे यांची कोंडी झाल्याचं बोलले जातेय. भाजपने गृह खाते सोडण्यास नकार दिलाय. त्याशिवाय नगरविकास खातेही भाजप आपल्याकडेच ठेवणार असल्याचं बोलले जातेय. त्यामुळे खातेवाटपात शिंदेंची कोंडी झाली का? असा सवाल राजकीय विश्लेषकांनी उपस्थित केलाय.

Namdeo Kumbhar

गणेश कवाडे, साम प्रतिनिधी

Maharashtra government formation : खातेवाटपामुळे महायुतीच्या सत्ता स्थापनेला मुहूर्त मिळत नसल्याचं दिसत आहे. मुख्यमंत्रि‍पदाचा घोळ संपल्यानंतर आता गृहमंत्रिपदावरुन रस्सीखेच सुरु झाल्याचं दिसतेय. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून गृह मंत्रालयावर दावा ठोकण्यात आलाय. पण भाजपकडून शिंदेंची मागणी फेटाळून लावली आहे. त्याशिवाय शिंदेंकडे असणारे नगरविकास मंत्रालय भाजप आपल्याकडे ठेवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजप, शिवसेनेत गृहमंत्री पदावरून होणार रस्सीखेच? सुरु झालाय का? अशी चर्चा सुरु झाली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप मुख्यमंत्रिपदासोबत गृह तसेच नगरविकास मंत्रालय आपल्याकडेच ठेवणार आहे. शिवसेनाला उपमुख्यमंत्रिपदासोबत सार्वजनिक बांधकाम तसेच महसूल मंत्रालय देणार असल्याची माहिती मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थ खातं दिलं जाणार आहे.

एकनाथ शिंदेंची मागणी फेटाळली -

सध्या महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा पेच सुटतानाच मंत्रिपदावरून सध्या रस्सीखेच सुरू झालाय. मुख्यमंत्रिपद सोडताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून गृह विभागाची प्रामुख्याने मागणी करण्यात आली. मात्र सर्वाधिक महत्त्वाचं खातं असल्याने हे खातं भाजपने सोडण्यास थेट नकार दिला आहे. परंतु राज्य गृहमंत्री हे खाते मात्र एकनाथ शिंदेंना सोडण्यात येईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे,.

एकनाथ शिंदेंची भाजपकडून कोंडी?

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात ठेवताच भाजपने नगर विकास विभाग देखील आपल्याकडे घेण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपद असताना नगरविकास खातं स्वतःकडे ठेवण्यात आलं होतं, मात्र यावेळेस हे खातं भाजप आपल्याकडे घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

भाजपकडे असणारे दोन महत्त्वाचे खाते ती म्हणजे सार्वजनिक बांधकाम आणि महसूल खातं हे मात्र उपमुख्यमंत्रीपदासोबत एकनाथ शिंदे दिले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपदासोबत अर्थ खातं दिल जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठलाची पदस्पर्श दर्शन रांग गोपाळपूरपर्यंत जाऊन पोहोचली

Post Office Scheme: पोस्टाची जबरदस्त योजना! एकदा गुंतवणूक करा अन् फक्त व्याजातून दर महिन्याला मिळवा ५५०० रुपये

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT