ladki bahin yojana update  Saam tv
महाराष्ट्र

ladki bahin yojana : अपात्र लाडकींकडून 21 हजार कोटींची लूट; 20 महिने सरकारचे पैसे लाटले

ladki bahin yojana update : लाडकी बहीण योजनेबाबत मोठी माहिती समोर आलीय. अपात्र लाडकींनी सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटींचा डल्ला मारलाय. ई-केवायसी आणि माहिती पडताळणीत धक्कादायक वास्तव समोर आलंय. पाहूया एक खास रिपोर्ट....

Girish Nikam

राज्य सरकारला डोईजड झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील धक्कादायक वास्तव समोर आलंय. या योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जांची काटेकोर पडताळणी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. एकाच घरात जास्त लाभार्थी, अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, चार चाकी वाहन असणे अशा निकषात न बसणा-या लाखो अपात्र महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं उघड झालंय. बोगस लाडकींनी सरकारच्या तिजोरीवर कसा डल्ला मारलाय पाहा...

अपात्र लाडकींचे 21 हजार कोटी पाण्यात

- मार्चअखेर झालेल्या पडताळणीत 71 लाख महिला अपात्र

- अपात्र बहिणींना 21 हजार 300 कोटींचे वाटप

- बोगस लाभार्थ्यांनी 20 महिन्यांचे हप्ते लाटले

- 2,652 सरकारी महिला कर्मचारीही लाभार्थी

- 12 हजारांपेक्षा जास्त पुरुषांनी अर्ज करुन पैसे लाटले

- पडताळणीत 1 कोटी 75 लाख महिला पात्र

सरकारने मतांसाठी योजना आणली. आता हे पैसे कसे वसूल करणार ? असा सवाल विरोधकांनी केलाय. आता सरकारने लाभार्थ्यांसाठी केवायसी अनिवार्य केले आहे. त्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

2024 विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी ही योजना सुरू केली होती. मात्र अर्जांची छाननी न करता दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ देण्यात आला. निवडणुकीत गेमचेंजर ठरलेल्या या योजनेमुळे सरकारी तिजोरीचे तीन तेरा वाजवल्याचं आता पुढं आलंय. आणि त्यामुळेच गेल्या २० महिन्यात तब्बल २१ हजार कोटी रुपये पाण्यात गेले आहेत. त्यामुळे सरकार आता बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करणार का ? हा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi: धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाही तोपर्यंत चर्चा नाही, राहुल गांधी आक्रमक

Maharashtra News Live Update: केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चेसाठी CJP रवाना

Kitchen Hacks : फ्रिजमधून घाण वास येतोय ? तर चहापत्तीचा 'हा' भन्नाट उपाय करून पाहा

मोठी बातमी: NEET पेपरफुटी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आक्रमक! केंद्र अन् NTA वर ताशेरे; कोर्टात नेमकं काय घडलं?

Crime: मित्रासमोरच तरुणीवर सामूहिक बलात्कार, जंगलात फिरण्यासाठी गेले असता भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT