Satara Distict Bank Election Saam Tv
महाराष्ट्र

Bank Election: जिल्हा बँकांची तिजोरी कुणाकडे? साताऱ्यात शिंदेसेना भाजपचा बदला घेणार?

Satara Distict Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. साताऱ्यात शिंदेसेना भाजपचा बदला घेणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Suprim Maskar
  • सातारा सांगली अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक निकाल जाहीर

  • सातारा जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला शिंदेसेना रोखणार

  • सातारा जिल्हा बँकेत शिंदेसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याची चर्चा

सातारा, सांगली आणि अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय...मात्र सहकार क्षेत्रातील या निवडणुकीत कुणाचा डंका वाजला? कुणाला दणका बसला? आणि या निकालांनंतर जिल्हा बँकांची तिजोरी नेमकी कुणाच्या हाती जाणार? पाहुयात साम टीव्हीच्या या स्पेशल रिपोर्टमधून...

पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी समजल्या जाणाऱ्या सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या तीन महत्त्वाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या निकाल लागले. साताऱ्यात जरी भाजपनं वर्चस्व राखलं असलं, तरी सत्ता स्थापनेत नाट्यमय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषद निवडणुकीवेळी भाजपने शिंदेसेना आणि राष्ट्रवादीला कात्रजचा घाट दाखवला होता. त्यामुळे आता थेट जिल्हा बँकेवर निवडून आलेले शिंदेसेनेचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील 'बदला' घेण्याची संधी साधणार का याची उत्सुकता आहे. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपला 9, दादांच्या राष्ट्रवादीला 8 जागा मिळाल्या आहेत. तर शिंदेसेनेनं 4 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र आल्यास भाजपला सत्तेपासून दूर राहावं लागणार.

दुसरीकडे सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटलांनी चांगलीच गुगली टाकली होती... दुष्काळामुळे वरिष्ठांच्या सूचनेनुसार 21 पैकी 15 जागा आधीच बिनविरोध करून घेण्यात आल्या...मात्र, जत, मिरज, कवठेमंकाळ आणि तासगाव या 6 जागांवर अटीतटीची लढत झाली. त्यात सांगली जिल्हा बँकेत काँग्रेसला 6, भाजपला 5, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 4, शिंदेसेनाला 2, दादांच्या राष्ट्रवादीला 2, आणि अपक्षानं एक जागेवर विजय मिळवला. विशेष म्हणजे जत सोसायटी गटातून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजय मिळवून जिल्हा बँकेत दमदार एन्ट्री केली. तर तासगावमधून माजी खासदार संजयकाका पाटील यांनी माजी आमदार सुमनताई पाटलांचा अवघ्या 2 मतांनी पराभव केलाय.

अहिल्यानगर सहकारी बँकेच्या 21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील पारंपरिक विरोधक एकत्र आले. त्यामुळे 11 जागांवर थोरात-विखे पाटलांच्या पॅनलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. मात्र विखे- थोरात पॅनलविरोधात शड्डू ठोकणारे खासदार निलेश लंकेंनीही विजय मिळवला. या विजयाच्या निमित्तानं निलेश लंकेंनी पहिल्यांदात जिल्हा बँकेंच्या राजकारणात प्रवेश केलाय. मात्र या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांना पराभवाचा सामना करावा लागला.

विखे- थोरात सहकार विकास पॅनल- 18

लंके परिवर्तन पॅनल- 1

राम शिंदे प्रणित उमेदवार- 2

पश्चिम महाराष्ट्रातील या तीन महत्त्वाच्या जिल्हा मध्यवर्ती बँकांचे निकाल केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नसून, येत्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि राजकीय समीकरणांवर थेट परिणाम करणारे ठरणार आहेत. त्यामुळे आता साताऱ्यात भाजपला रोखण्यासाठी शिंदेसेना-राष्ट्रवादी एकत्र येणार का? सांगलीत पडळकरांच्या एन्ट्रीने काय उलथापालथ होणार? आणि अहिल्यानगर बॅकेतील विजयानंतर विखे- थोरांताच्या समर्थकांच्या पॅनलमध्ये चेअरमन कोण होणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलयं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips for Shoes and Footwear: घराच्या दारासमोर चप्पल-बूट ठेवावे की नाही? जाणून घ्या वास्तुशास्त्रातील ५ महत्त्वाचे नियम!

सत्तेतला पक्ष, पण कामांचा पत्ता नाही? वरिष्ठ नेत्यांमधील वादाचा फटका पक्षाला? देवगिरीवरील बैठकीत नेमकं काय घडलं?

दुष्काळात पंकजा मुंडेंचा रॅम्प वॉक! विरोधकांच्या टीकेला दिलं सडेतोड उत्तर

Metro 4: 316 आसन क्षमता, 6 डबे; अशी असेल मुंबई ते ठाणेदरम्यान धावणारी मेट्रो, आंध्रप्रदेशच्या कारखान्यातून मेट्रो 4 चा ग्राऊंड रिपोर्ट

राष्ट्रवादीत पार्थवरून महाभारत? पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर आमदार नाराज? NCPच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT