भाजपचं सरकार असलेल्या राज्याचं नाव बदलणार; पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, राजकीय वर्तुळात खळबळ

West Bengal to Be Renamed Paschim Banga?: पश्चिम बंगालचे नाव बदलून पश्चिम बंगा करण्याचा प्रस्ताव सरकारकडून मांडण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा केली.
West Bengal to Be Renamed Paschim Banga?:
West Bengal Name Change: Cm Announces Paschim Banga Proposalsaam tv
Published On: 
Summary
  • पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांची नामांतराबाबत मोठी घोषणा

  • पश्चिम बंगाल सरकारचा राज्याचे नाव बदलण्याचा निर्णय

  • ६ डिसेंबर रोजी विधानसभेत नामांतराचा ठराव मांडला जाणार

भाजपशासित राज्यात अनेक शहरांची आणि गावांची नावे बदलण्यात आली आहेत. उत्तर प्रदेश, दिल्ली असो की महाराष्ट्र या राज्यांमध्ये गाव आणि शहरांची नाव बदलण्यात आली आहेत. आता भाजपचं सरकार असलेल्या राज्यात थेट राज्याचं नाव बदललं जाणार आहे. खुद्द तेथील मुख्यमंत्र्यांनी नाव बदलण्याची घोषणा पत्रकार परिषदेत केली आहे. ज्या राज्याचे नाव बदलण्यात येणार आहे, ते राज्य आहे, पश्चिम बंगाल.

आता पश्चिम बंगालचे नाव बदलून ते 'पश्चिम बंगा' (Paschim Banga) असे केले जाणार आहे. यासंदर्भातील एक ठराव ६ तारखेला विधानसभेत मांडला जाणार आहे. राज्यातील गोहत्येच्या मुद्द्यावर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी वृद्ध गाईंची काळजी घेणाऱ्या संस्थांना १ लाख रुपयांपर्यंतचे सरकारी अनुदान देण्याची एक योजना सुरू करण्याचीही घोषणा केलीय. मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी हे एका आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

West Bengal to Be Renamed Paschim Banga?:
उत्तर प्रदेशात भाजपविरोधात नवी रणनीती? सपा-काँग्रेसचा मास्टरप्लॅन तयार, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला

मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी यांनी सांगितले की, राज्याचे नाव बदलण्याबाबतचा ठराव ६ तारखेला विधानसभेत मांडला जाईल. त्यानंतर, विहित प्रक्रियेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल. दरम्यान राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव भाजपने यापूर्वीही मांडला होता. याआधी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सामिक भट्टाचार्य यांनीही असे म्हटले होते की, राज्याचे नाव बदलून 'पश्चिम बंगा' करण्यासाठी विधानसभेत विधेयक आणले जाईल. राज्याचे नाव त्याच्या इतिहासाशी जोडण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलले जात असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

West Bengal to Be Renamed Paschim Banga?:
राज्य सरकार आपोआप कोसळणार; AIADMK नेत्यानं सांगितलं कारण, मुख्यमंत्री विजय यांचं टेन्शन वाढलं

वाराणसीमध्ये होणाऱ्या 'पश्चिम बंगाल भवन'बाबत त्यांनी असेही म्हटले होते की, हे भवन बंगालमधून येणाऱ्या पर्यटकांसाठी आणि तीर्थयात्रींसाठी निवासाची सोय उपलब्ध करून देण्यासोबतच राज्याच्या संस्कृतीलाही प्रोत्साहन देईल. पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोहत्येला विरोध करताना मोठी घोषणा केली आहे.

राज्यात गोहत्या करण्यास परवानगी दिली जाणार नाही. तसेचअशा प्रकारच्या घटना अजूनही छुप्या पद्धतीने घडत आहेत आणि सरकार त्याविरुद्ध कारवाई करत आहे. सरकार सत्तेत आल्यापासून 'कॅटल ॲक्ट, १९५०' (Cattle Act of 1950) लागू करण्यात आला आहे. या विषयावर उच्च न्यायालयाचा आदेशही अस्तित्वात आहे. कत्तलखाने (स्लॉटरहाउसेस) हा एक वेगळा विषय असला, तरी अशा प्रकारे गाईंची कत्तल होऊ दिली जाणार नाही, असं मुख्यमंत्री म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.