हिंदू धर्मात वधू लग्नानंतर लाल बांगड्या का घालतात? हिरव्या-पिवळ्या का नाही? काय आहे पारंपरिक महत्त्व

Bharat Jadhav

'सोळा शृंगार

हे 'सोळा शृंगारां'पैकी एक आहे, ते पतीच्या उत्तम आरोग्याचे आणि प्रजननक्षमतेचे प्रतीक असून, स्त्रीच्या विवाहित जीवनातील प्रवेशाची स्पष्ट खूण मानले जाते.

शक्तीचे प्रतीक

हिंदू धर्मानुसार लाल रंग 'शक्ती'चे (दैवी स्त्री-शक्तीचे) प्रतिनिधित्व करते. ही तीच दुर्गा देवी, माता लक्ष्मी आणि पार्वती मातामध्ये जी शक्ती असते, तीच शक्ती यातून स्त्रिला मिळत असते.

समृद्धी, शक्ती आणि भक्ती

हातात लाल बांगड्या घातलेली वधू जेव्हा आपल्या नवीन घरात प्रवेश करते, तेव्हा तिला एका देवीचे रूप मानले जाते. ती आपल्यासोबत समृद्धी, शक्ती आणि भक्ती घेऊन येते. लाल रंग हा ठळक आणि लक्ष वेधून घेणारा असल्याने, ती आपल्यासोबत जे काही घेऊन येते, त्याचेच प्रतीक बनत असते.

विवाहाचे प्रतीक

वधूने घातलेल्या लाल बांगड्या तिच्या विवाहित जीवनातील प्रवेशाचे प्रतीक असते. या बांगड्यांना पवित्र अलंकार मानले जाते. लग्नानंतर ४० दिवसापर्यंत या बांगड्या हातात घातल्या जातात.

संरक्षण आणि आशीर्वाद

लाल बांगड्या परिधान करण्याच्या विधीमागे अशी धारणा आहे की, यामुळे वधूच्या आयुष्यातील नवीन टप्प्याच्या सुरुवातीला तिला दैवी संरक्षण आणि आशीर्वाद प्राप्त होतात. या बांगड्या नकारात्मक ऊर्जा दूर करतात. नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यात आशीर्वाद घेऊन येतात.

ज्योतिषशास्त्रीय महत्त्व

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक रंगात विशिष्ट ग्रहांची ऊर्जा असते असे मानले जाते. लाल रंगावर मंगळ ग्रहाचे अधिपत्य आहे. हा ग्रह विवाह, धैर्य आणि ऊर्जेचे प्रतिनिधित्व करते. जर मंगळ ग्रह अशुभ स्थितीत असेल किंवा पीडित असेल, तर वैवाहिक जीवनात मोठ्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, जेव्हा वधू 'चूडा' (लाल बांगड्या) परिधान करते, तेव्हा ती मंगळ ग्रहाची सकारात्मक ऊर्जा अधिक बळकट करते.

डिस्क्लेमर:

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.