Maharashtra Dam Water Level Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Dam Water Level: आनंदवार्ता! मराठवाड्यासह राज्याचं पाणी टेन्शन मिटलं, धरणं ८६ टक्के भरली; वाचा ताजी आकडेवारी

Maharashtra Rain And Dam Water Level: राज्यामध्ये यावर्षी मागच्यावर्षीच्या तुलनेत चांगला पाऊस पडला आणि धरणांच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली. त्यामुळे राज्याचे यावर्षीचे पाणी टेन्शन मिटलं आहे.

Priya More

राज्यामध्ये यावर्षी खूपच चांगला पाऊस झाला. परतीच्या पावसाने देखील राज्यातील अनेक जिल्ह्यांना मोठा दिलासा दिला. कारण राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. त्यामुळे दुष्काळग्रस्त असणाऱ्या मराठवाड्यासह राज्यातील पाणी टेन्शन मिटलं आहे. राज्यातील सर्व विभागांमधील धरणांमध्ये एकूण ८६ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या पाणीसाठ्यामध्ये तब्बल १६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागच्यावर्षी या दिवशी धरणांमध्ये ७० टक्के पाणीसाठा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा राज्यातील कोकण विभागामधील धरणांमुळे सर्वाधिक पाणीसाठा जमा झाला आहे. कोकण विभागामध्ये ९४ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तर दुष्काळग्रस्त मराठवाड्यातही ७३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. मराठवाड्यातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला. या पावसाने सरासरी ओलांडून आतापर्यंत १०३ टक्के पावासाची नोंद झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊसही चांगला झाला आणि धरणांमधील पाणीसाठ्यातही चांगली वाढ झाली.

महत्वाचे म्हणजे मान्सून दाखल झाल्यानंतर पहिले काही दिवस म्हणावा तसा पाऊस झाला नाही. पण त्यानंतर पावसाने जोर पकडला. जुलै आणि ऑगस्टसह सप्टेंबर महिन्यामध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत गेली. सध्या राज्यात परतीचा पाऊस सुरू आहे. या पावसामुळे देखील धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे यावर्षी राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.

राज्यातील विभागनिहाय धरणांमधील पाणीसाठा -

नागपूर - ८७.७५ टक्के

अमरावती - ८९.९२ टक्के

संभाजीनगर - ७३.५५ टक्के

नाशिक - ८१.४८ टक्के

पुणे - ९०.६८ टक्के

कोकण - ९४.२१ टक्के

राज्यात सप्टेंबर महिन्यात सरासरी पावसाची नोंद -

अमरावती - १५५.९ मिमी

नाशिक - ११७.८ मिमी

नागपूर - २०२.४ मिमी

संभाजीनगर - २२२.७ मिमी

पुणे -१२५.३ मिमी

कोकण - ३४९.६ मिमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indian Student Death : अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या, अज्ञातांनी छातीत गोळ्या घालून संपवलं

Maharashtra Live News Update : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले पुरस्काराने सन्मान

आदिवासींकडून पोलीस ठाण्यावर दगडफेक, अनेक पत्रकार, पोलीस जखमी; नेमकं काय घडलं? VIDEO

IND vs AUS: विराट-रोहितचा युग संपला, २०२७ चा वर्ल्डकप खेळणार नाही? कुणी दिले संकेत

Chhagan Bhujbal: ओबीसी नेत्यांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर मंत्री छगन भुजबळ आक्रमक|VIDEO

SCROLL FOR NEXT