IMD Rain Alert : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट

Maharashtra Rain Alert : भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट
weather Alert Heavy Rain of MaharashtraSaam TV
Published On

मागील काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभरात पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, आज शनिवारपासून पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होण्याची चिन्हे आहे. भारतीय हवामान खात्याने आजपासून राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पिकांची काळजी घ्यावी, असं आवाहनही करण्यात आलंय.

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट
IMD Rain Alert : महाराष्ट्रासह 20 राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, हवामान खात्याचा अलर्ट; वाचा वेदर रिपोर्ट

दुसरीकडे मुंबईसह उपनगरातही पावसाच्या सरी (Maharashtra Rain Update) कोसळण्याची शक्यता आहे. येत्या 24 तासांत मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात चांगला पाऊस होईल, असं हवामान खात्याने सांगितलं आहे. सध्या बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने देशातील वातावरण अनेक मोठे बदल होत आहे. काही ठिकाणी उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत.

पश्चिम बंगाल, ओडिशा राज्यांत मुसळधार पाऊस (Heavy Rain Alert) सुरू आहे. तर झारखंड आणि बिहारला देखील पावसाने चांगलंच झोडपून काढलंय. हिमाचलमध्ये सुरु असलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा वाढला असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे.

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय

परतीचा प्रवास सुरु होण्याआधी महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होत आहे. येत्या 24 तासांत मराठवाडा, खान्देशमध्ये हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्येही पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पुणे नवी मुंबई आणि रायगड पट्ट्यात हलका ते मध्यम पाऊस होईल, असं आयएमडीने सांगितलं आहे.

या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

आयएमडीने पुढील २४ तासांसाठी जळगाव, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भ, मराठवाडा, अहमदनगर, सोलापूर जिल्ह्यांना देखील यलो अलर्ट देण्यात आला आहे. रविवारी विदर्भातील काही जिल्ह्यांना पाऊस झोडपून काढणार असून उर्वरित भागात ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय, मराठवाडा-विदर्भात जोरदार पाऊस होणार; या जिल्ह्यांना अलर्ट
Weather Forecast : देशातील १८ राज्यांना आज पावसाचा अलर्ट, महाराष्ट्रातील या भागात दिवसभर कोसळणार पाऊस

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com