Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्याचे टेन्शन मिटलं! जायकवाडी धरण १०० टक्के भरले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Jayakwadi Dam News: मराठवाड्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. जायकवाडी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील नागरिकांचे वर्षभराच्या पाण्याचे टेन्शन मिटले आहे.
Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्याचे टेन्शन मिटलं! जायकवाडी धरण १०० टक्के भरले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Jayakwadi Dam Water LevelSaam Tv
Published On

माधव सावरगावे, संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मराठवाड्यातील नागरिकांच्या वर्षभराच्या पाण्याचे टेन्शन मिटलं आहे. कारण मराठवाड्याला पाणीपुरवठा करणारे जायकवाडी धरण ९९.५० टक्के भरले आहे. हे धरण १०० टक्के भरण्याच्या मार्गावर आहे. या धरणामधून कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जायकवाडी धरणाचा जलसाठा ९९.५० टक्क्यांवर पोहचला आहे. जायकवाडी धरणातून कोणत्याही क्षणी पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे गोदावरी नदीकाठच्या गावांना पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यापूर्वीच धरणांचे १२ दरवाजे उघडण्यात आले होते. त्यावेळी ९ हजार ८०० क्षमतेने गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले होते. आता पुन्हा जायकवाडी धरणांमध्ये पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून धरणामधून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्याचे टेन्शन मिटलं! जायकवाडी धरण १०० टक्के भरले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Sambhajinagar News : दीड एकरात पीक घेतलं, लाखोंचा खर्च; हतबल झालेल्या शेतकऱ्यानं पिकावर फिरवला रोटोव्हेटर

जायकवाडी प्रकल्पाच्या उर्ध्व भागातील वैजापूर, गंगापूर, तालुक्यात सध्या ढगाळ वातावरण आहे आणि काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे जायकवाडी धरण १०० टक्के भरत आल्याने कोणत्याही क्षणी धरणातून नदीपात्रात विसर्ग केला जाईल. त्यामुळे गोदावरी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. हेच लक्षात घेता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान खात्याकडून मराठवाड्याला मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यामध्ये आज आणि उद्या पावसाचे प्रमाण मध्यम ते जोरदार राहण्याची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, धाराशिव जिल्ह्याला पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर लातूर, बीड आणि नांदेड जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहावे आणि काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Jayakwadi Dam Water Level: मराठवाड्याचे टेन्शन मिटलं! जायकवाडी धरण १०० टक्के भरले, गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com