Pavana Dam : मावळ, पिंपरी चिंचवडकरांची पाण्याची चिंता मिटली; पवना धरण शंभर टक्के भरले

Maval News : मागील काही दिवसात पुन्हा जोरदार पावसामुळे उशिरा का होईना पवना धरण शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे
Pavana Dam
Maval NewsSaam tv
Published On


मावळ
 : यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणातील पाण्यातील साठ्यात वाढ झाली आहे. यानुसार मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणारे पवना धरण देखील शंभर टक्के भरले आहे. यामुळे पुढील वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. 

मागील महिन्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे तळ गाठलेले पवना धरण (Pavana Dam) शंभरीच्या जवळपास पोहोचले होते. मात्र आता मागील काही दिवसात पुन्हा जोरदार पावसामुळे उशिरा का होईना पवना धरण शंभर टक्के भरल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. मावळ तालुक्यातील पवना धरणाचे पाणी पवन मावळ (Maval), तळेगाव, देहूरोड या भागासह पिंपरी चिंचवड शहर व एमआयडीसी भागात दिले जाते. आता हे धरण भरल्याने पाण्याची चिंता मिटली आहे. 

Pavana Dam
Dhule News : घरफोडी करणारे सराईत ताब्यात; दागिन्यांसह ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

साधारण धरणात साडेआठ टीएमसी साठवणूक क्षमता असलेल्या या धरणात आता १३६८ मिली मिटर या मोसमात पाणीसाठा झाला आहे. पाण्यावर पवन मावळ्याची शेती देखील अवलंबून आहे. असे हे अतिशय महत्त्वाचे धरण भरल्याने मावळ व पिंपरी चिंचवडकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com