Oath Ceremony Saam tV (संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

Maharashtra CM Oath Ceremony : मंत्रिमंडळाचा तिढा कायम? फक्त ३ जणांचाच आज शपथविधी होणार

Devendra Fadnavis Ajit Pawar and Eknath Shinde Oath Ceremony : आझाद मैदानावर आज महायुतीच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह दिग्गज भाजप नेते या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत.

Namdeo Kumbhar

अक्षय बडवे, साम प्रतिनिधी

Devendra Fadnavis oath ceremony 2024 LIVE Updates Maharashtra CM News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन उपमुख्यमंत्री, असा तीन जणांचाच आज शपथविधी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महायुतीतील तीन घटक पक्षांमध्ये खातेवाटप आणि मंत्र्यांची संख्या यावर एकमत झाल्यानंतरच इतरांचे शपथविधी होणार आहे. १६ डिसेंबरपासून होणाऱ्या हिवाळी अधिवेशन आधी इतर मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असे समजतेय.

तिघांचा शपथविधी न करता प्रत्येकी दोन किंवा तीन म्हणजे एकूण नऊ किंवा बारा मंत्र्यांचा शपथविधी करण्याच्या मुद्द्यावर वरिष्ठ नेत्यांची रात्री उशिरापर्यंत चर्चा सुरु होती. पण याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली आहे. याबाबतचा अंतिम निर्णय काही वेळातच समोर येईल मात्र तूर्तास तीन जणांचाच शपथविधी होणार असल्याचे समजतेय.

महायुतीकडून बुधवारी राज्यपाल यांच्यासमोर सत्तास्थापनेचा दावा केला गेला आणि त्याला राज्यपाल यांनी देखील मंजुरी दिली. शपथविधी सोहळा आज संध्याकाळी साडेपाच वाजता होणार असल्यामुळे एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांच्यासह इतर कोणी मंत्री शपथ घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

मात्र महायुतीच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुती मधील पक्षांचे मंत्र्यांची संख्या आणि खातेवाटप यावर जोपर्यंत चर्चा पूर्ण होत नाही. तोपर्यंत इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार नाही, असं सांगण्यात आलं आहे. दुसऱ्या बाजूला हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणे गरजेचे असल्यामुळे 11 किंवा 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पूर्वी इतर मंत्र्यांची शपथ होईल असं देखील सूत्रांनी सांगितले.

बुधवारी रात्री उशिरापर्यंत महायुतीतील अनेक नेत्यांच्या निवासस्थानी इतर मंत्र्यांच्या शपथविधी बद्दल चर्चा झाल्या. मात्र यावर आज सकाळपर्यंत कुठलाही ठोस निर्णय न झाल्यामुळे तीनच जण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथ घेतील, अशी माहिती विश्वासनीय सूत्रांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात भयकंर घडलं! दारूसाठी पैसे मागितले, आईने दिला नकार; तरुणाने आईवर चाकूने केले सपासप वार

Gautami Patil: 'राधा ही बावरी' गौतमी पाटीलचं सुंदर सौंदर्य; फोटो पाहा

Gautami Patil Dance : काय सांगू रं गोविंदा, गौतमीने दावली फिल्मी अदा; मुंबईकरांचा दहीहंडीचा उत्साह शिगेला, VIDEO

Maharashtra Live News Update: इंदापुरात दहाहून अधिक नागरिकांना पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला चावा

Election Commission press conference : निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार की आणखी काही...

SCROLL FOR NEXT