Devendra Fadnavis : 'CM शिंदे प्रमुख, त्यांच्या नेतृत्वाखाली...'; महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य

Devendra Fadnavis news : महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत फडणवीसांचं मोठं भाष्य केलं आहे. मुख्यमंत्रिपदाच्या चेहाऱ्याबाबत मुख्यमंत्री शिंदे प्रमुख असल्याचं भाष्य देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.
'CM शिंदे प्रमुख, त्यांच्या नेतृवाखाली...'; महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis :Saam tv
Published On

पराग ढोबळे, साम टीव्ही प्रतिनिधी

नागपूर : राज्यात मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. एकीकडे महाविकास आघाडीत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यास सांगण्यात येत आहे. आता महायुतीतही मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून चर्चा सुरु झाली आहे. या महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याच्या चर्चेवर देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. महायुतीत मुख्यमंत्री शिंदे प्रमुख असल्याचं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

नागपूर महानगरपालिकेत जनसामान्यांचा समस्यांना धरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आढावा घेतला. या आढावा बैठकीत मनपा आयुक्त, भाजप आमदारसहित सर्व अधिकारी उपस्थित होते. कॉंग्रेसचे आमदार नितीन राऊत, विकास ठाकरे हे देखील बैठकीला उपस्थित होते. मनपा,महामेट्रो, नागपूर सुधार प्रान्यास, एनएमआरडीएचे अधिकारी उपस्थित होते.

'CM शिंदे प्रमुख, त्यांच्या नेतृवाखाली...'; महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
CM Eknath Shinde Exclusive : 'महायुतीचा कॅप्टन मीच', CM शिंदे काय म्हणाले? वाचा

नागपुरातील बैठकीतनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. महायुतीतील मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'विनाकारण गोंधळ तयार करण्याचे कारण नाही. महायुतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख आहे. आम्ही त्यांचा नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहे. हा निर्णय घेण्याचा आधिकार माझा स्तरावर नाही. मला यावर बोलण्याचा मला नाही'.

'महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासंदर्भात आमचं पार्लमेंटरी बोर्ड आणि मुख्यमंत्री शिंदे आणि अजितदादा पवार हे दोन्ही नेते मिळून सगळे निर्णय करतील. निवडणुकीआधी करायचा की नंतर याचाही निर्णय तेच करतील. यासंदर्भात कुठलेही बोलण्यात अधिकार मला नाही. पण गोंधळही काहीच नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'CM शिंदे प्रमुख, त्यांच्या नेतृवाखाली...'; महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबत फडणवीसांचं मोठं वक्तव्य
मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार!; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 'साम'वर Exclusive

नागपूरकरांच्या समस्यांबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, 'नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात आढावा घेतला. सिव्हरेज आणि वाटर प्लान तयार केला आहे. आम्ही लवकरच कनेक्शन करून पाणी लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे, यासाठी चर्चा झाली. नाग नदीला २४०० कोटी मिळाले. मोठं सिव्हरेज नेटवर्क तयार करता येईल. शहरातील रस्ते आणि अविकसित लेआऊट पाणी पाईपलाईनसाठी चर्चा झाली'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com