CM Devendra Fadnavis : मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... शपथ घेतो की

Devendra Fadnavis oath ceremony : मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस... शपथ घेतो की, मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. फडणवीस महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.
Devendra Fadnavis oath ceremony
Devendra Fadnavis oath ceremony
Published On

Maharashtra CM Oath Ceremony : होय... देवेंद्र गंगाधरराव फडणवीस महाराष्ट्राचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालंय... आरएसएसचे स्वयंसेवक, सर्वात तरुण महापौर, मॉडेल आमदार ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री अशी गरुडझेप घेतलीय.. त्यांचा मॉडेल ते रोल मॉडेल हा प्रवास थक्क करणारा आहे.

गोष्ट आहे 2006 ची.... सर्वात तरुण महापौर असा रेकॉर्ड नावावर केलेल्या फडणवीसांनी दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर चक्क मॉडेलिंग केलं होतं. नागपूर शहरातील चौका-चौकात होर्डिंग लावले होते आणि त्यावर फोटो होता युवा आमदार देवेंद्र फडणवीस यांचा.

Devendra Fadnavis oath ceremony
Oath Ceremony News : शपथविधीसाठी वाहतुकीत बदल, मुंबईती या मार्गावरील वाहतूक बंद

देवेंद्र फडणवीसांनी आंबिका मेन्स या कपड्याच्या दुकानासाठी मॉडेलिंग केली होती. हिच मॉडेलिंगची गोष्ट नागपूरमधून थेट माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या कानावर गेली आणि वाजपेयींनी मॉडेल आमदार फडणवीसांना भेटीसाठी बोलावलं. त्यावेळी फडणवीस भेटीसाठी पोहचताच वाजपेयींनी आईए... मॉडेल विधायक जी म्हणत फडणवीसांचं स्वागत केलं.पुढे हेच फडणवीस महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्री बनले. हा प्रवास कसा होता पाहूयात....

देवेंद्र फडणवीसांची राजकीय कारकीर्द

1992 : नागपूर महापालिकेचे युवा नगरसेवक म्हणून निवडून आले

1997 : सर्वात तरुण महापौर बनले

1999 : पहिल्यांदा आमदारपदी निवडून आले

2013 : महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनले

2014 : शरद पवारांनंतर महाराष्ट्राचे दुसरे तरुण मुख्यमंत्री बनले

2019 : फक्त 80 तासांसाठी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपद

2019 : विरोधी पक्षनेते पदी निवड

2022 : पक्षादेश पाळत फडणवीस उपमुख्यमंत्री बनले

2024 : फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

Devendra Fadnavis oath ceremony
Devendra Fadnavis: २२ व्या वर्षी नगरसेवक ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री; देवेंद्र फडणवीसांचा राजकीय प्रवास

2019 मध्ये महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर फडणवीस टीकेचे धनी बनले.त्यातच 2022 मध्ये मुख्यमंत्रिपदावरून उपमुख्यमंत्रिपदावर घसरण झाली. एवढंच नाही तर लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवामुळे फडणवीसांच्या कारकीर्दीवर प्रश्न उपस्थित केले जात होते. फडणवीसांचं राजकारण संपल्याची चर्चा केली जात होती. मात्र फडणवीसांनी जोरदार कमबॅक करत भाजपला राज्यातील सर्वाधिक जागा मिळवून देत आपलं नेतृत्व सिद्ध केलंय. त्यामुळे फडणवीसच म्हणाले होते त्याच शब्दात.

Devendra Fadnavis oath ceremony
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांच्या नावावर कसं शिक्कामोर्तब? फडणवीसांच्या सीएमपदाची इनसाईड स्टोरी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com