Manasvi Choudhary
देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस यांना 'राजकरणातला खरा कलाकार' म्हणून ओळखले जाते.
३० वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत.
२२ जुलै १९७० मध्ये नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला आहे.
नागपूर येथील सरस्वती शाळेत त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले. उच्च शिक्षण धरमपेठ कॉलेजमधून कॉमर्समधून घेतले.
कॉलेजमध्ये असताना त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सहभाग घेतला.
सुरूवातीला १९८९ मध्ये देवेंद्र फडणवीस भाजपचे नागपूर वॉर्ड अध्यक्ष बनले.
वयाच्या केवळ २२ व्या वर्षी ते नागपूर महानगरपालिकेत नगरसेवक झाले. १९९७ मध्ये वयाच्या २७ व्या वर्षी ते नागपूरचे महापौर झाले.
यानंतर १९९९ मध्ये नागपूर पश्चिममधून विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले. यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी सत्तेत होती.
विरोधक असताना त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या, सिंचन घोटाळा, तेलगी घोटाळा यावर आवाज उठवला.
२०१३ मध्ये त्यांची भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. २०१४ मध्ये पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले.
यानंतर २३ नोव्हेंबर २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले.