rahul gandhi arvind kejriwal saam tv
महाराष्ट्र

Delhi Election Result 2025 : अरविंद केजरीवालांसह काँग्रेसलाही धू-धू धुतलं; दिल्ली निकालानंतर महाराष्ट्रातील नेत्यांची टोलेबाजी

Maharashtra Bjp Leaders criticizes Arvind Kejriwal and Congress: काँग्रेसला लोकांचा विकास कधी कळला नाही. म्हणून त्यांची आज ही दशा झाली, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. अरविंद केजरीवालांवरही त्यांनी निशाणा साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष आणि काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर दिल्लीत फटाके फुटू लागले आहेत. दिल्लीच्या निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रातही राजकीय फटाके फुटायला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस यांच्यावर तुटून पडले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही तोफ डागली आहे. दिल्लीच्या जनतेनं केजरीवाल आणि काँग्रेसला धू धू धुतलं आहे, असं ते म्हणाले.

काँग्रेसला लोकांचा विकास कधीच कळला नाही म्हणून आज त्यांची ही अवस्था झाली आहे. दिल्लीच्या जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केंद्रातील आणि राज्यातील डबल इंजिन सरकारच आपला विकास करू शकतं, हे दिल्लीच्या जनतेने दाखवून दिलं आहे. तसेच दिल्लीच्या जनतेने अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसला धू-धू धुतलं आहे, असा हल्लाबोल बावनकुळेंनी केला.

आशिष शेलारही कडाडले!

भाजपचे नेते आशिष शेलार यांनीही केजरीवाल आणि काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. लुटणाऱ्या आणि संधीसाधू राजकारणाची दिल्लीकरांनी सफाई केली आहे. झाडूला बाहेर फेकलं आहे, असं शेलार म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत राष्ट्रवादी विचारधारेच्या बाजूने राजधानी दिल्लीने दणदणीत कौल दिला. तसेच अचानक उगवलेल्या राजकीय बांडगुळाला दिल्लीकरांनी फटकारले अशी टीकाही शेलार यांनी केली.

राहुल गांधींवर निशाणा

दिल्लीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. त्यावरूनही शेलार यांनी टोला लगावला. राहुल गांधी यांच्या काँग्रेसला मोठा भोपळा देऊन दिल्लीकरांनी त्यांना जागा दाखवून दिली आहे. आता ईव्हीएमला दोष देत आपले अपयश झाकण्याचा कार्यक्रम अजून जोरात करा, असा खोचक टोला त्यांनी लगावला.

मुंबईतही बदल घडवणार!

महाराष्ट्र जिंकलाच आज राजधानी दिल्ली पण जिंकली, असं शेलार म्हणाले. आता आर्थिक राजधानीतही मुंबईकर असाच बदल घडवून आणणार आणि 25 वर्षे पालिकेत भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसवणार, अशा शब्दांत त्यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर नेम साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT