Maharashtra Assembly Election 
महाराष्ट्र

Assembly Election: महायुतीत तेढ? आंबेगाव विधानसभा मतदारसंघात जागेसाठी रस्सीखेच; वळसे-पाटील यांच्यानंतर शिवसेनेचा दावा

Maharashtra Assembly Election: आंबेगाव विधानसभा मतदारसंघात महायुतीमध्ये तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनंतर आता शिवसेने या जागेवर दावा केलाय.

Bharat Jadhav

विधानसभा मतदरासंघाच्या जागांच्या दाव्यामुळे महायुतीत तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. आंबेगाव विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट राष्ट्रवादीने दावा केल्यानंतर आता शिवसेनेने देखील या जागेवर दावा केलाय. निवडणुकाजवळ आल्या असून प्रत्येक पक्ष आपआपल्या उमेदवारांची आणि मतदारसंघाची चाचपणी करत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील नेतेमंडळी जागावाटपासाठी आग्रही झालेत. मात्र जागांवरील दाव्यामुळे महायुतीत वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमने-सामने आलेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून आंबेगाव मतदारसंघावर दावा सांगण्यात आलाय. यामुळे या दाव्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडणार असल्याचं दिसत आहे. दिलीप वळसे पाटील यांनी नाईलाजास्तव निवडणूक लढविण्यापेक्षा मोठ्या मनाने शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा द्यावा, असं युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर म्हणालेत.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षमपणे काम करत आहे. जनतेचा जनाधार देखील त्यांच्यासोबत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामावर जनता समाधानी असल्याचं बांगर म्हणालेत. महायुतीतील सर्व घटकपक्ष आपापल्या पद्धतीने सरकारची विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. महायुतीतील जागावाटप अजूनही ठरले नाही. जागावाटप ठरविण्याचा अंतिम अधिकार महायुतीतील वरिष्ठ नेत्यांना आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आंबेगाव शिरूर विधानसभा मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकासकामे दोन वर्षात मार्गी लागलीत. शिवसेनेला मानणारा ६० ते ६५ हजार मतदार आंबेगाव शिरूर तालुक्यात असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला देण्यात यावा, अशी मागणी शिवसेना सचिव किरण पावसकर यांचेमार्फत शिवसेना मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे काही दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकीत शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलीय.

उमेदवारीबाबत अंतिम तोडगा अजूनही निघाला नसताना मंचर येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वळसे पाटील यांना निवडून आणण्याचे आवाहन केले आहे. वळसे पाटील यांनीही आपल्या भाषणात मुलगी पुर्वा वळसे पाटील निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक नसल्याने मला नाईलाजाने निवडणूक लढवावी लागत असल्याचे सांगितले आहे.

या वाक्यामुळे ते निवडणुकीला फारसे इच्छुक नसल्याचे दिसत आहे. नाईलाजाने उभे रहावे लागणार असेल तर त्यांनी आपले मन मोठे करुन सहकारी पक्ष असणाऱ्या शिवसेना पक्षाला संधी दिली पाहिजे असे तालुक्यातील सर्व शिवसैनिकांचे मत आहे. वळसे पाटील महायुतीतील मोठे नेते असल्याने त्यांचीही ताकद महायुतीला मिळू शकेल. पर्यायाने मोठ्या मताधिक्याने आंबेगाव शिरूर मतदारसंघात महायुतीचा भगवा डौलाने फडकेल, असा विश्वास युवासेना राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सचिन बांगर यांनी व्यक्त केला, मात्र त्यांच्या या दाव्याने महायुतीत वाद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT