Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचं 'मिशन मुंबई', ३६ विधानसभा मतदार संघांसाठी जोरदार फिल्डिंग; १८ नेत्यांकडे दिली मोठी जबाबदारी!

Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण अभियानानंतर शिवसेना ठाकरे गटाने 'मिशन मुंबई' हाती घेतलं आहे. 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे
Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचं 'मिशन मुंबई'! ३६ विधानसभा मतदार संघांसाठी जोरदार फिल्डिंग; १८ नेत्यांकडे दिली मोठी जबाबदारी
Maharashtra Assembly Election 2024:Saamtv
Published On

गिरीश कांबळे| मुंबई, ता. १८ ऑगस्ट २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाविकास आघाडीमध्ये विधानसभेचे जागावाटप अद्याप होणार आहे. त्याआधीच शिवसेना ठाकरे गटाने मुंबईमधील ३६ विधानसभा मतदार संघांसाठी कंबर कसली असून 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचं 'मिशन मुंबई'! ३६ विधानसभा मतदार संघांसाठी जोरदार फिल्डिंग; १८ नेत्यांकडे दिली मोठी जबाबदारी
Pune News : पुण्यातील जुन्नरमध्ये मोठा राडा, अजित पवारांविरोधात भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांची घोषणाबाजी, पाहा VIDEO

विधानसभेची मोर्चेबांधणी

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट कामाला लागला आहे. एकीकडे खासदार संजय राऊत यांनी विधानसभेच्या मोर्चेबांधणीसाठी उपराजधानी नागपूरमध्ये मुक्काम ठोकला आहे. अशातच महाराष्ट्रातील 42 लोकसभा मतदारसंघातील शिव सर्वेक्षण अभियानानंतर शिवसेना ठाकरे गटाने 'मिशन मुंबई' हाती घेतलं आहे. याचसंदर्भात शिवसेना ठाकरे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघांची मोर्चेबांधणी करण्यासाठी महत्वाची बैठक बोलावली आहे.

उद्धव ठाकरेंचं मिशन मुंबई!

आज पक्षाचे प्रमुख नेते आणि सर्वेक्षणासाठी नेमलेल्या पदाधिकाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे चर्चा करणार आहेत.त्याचबरोबर मुंबईतील 36 मतदारसंघांची जबाबदारी 18 नेते आणि 18 सहाय्यकांवर सोपवण्यात आली आहे. यामध्ये प्रत्येक नेत्यावर दोन विधानसभा मतदारसंघात सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईसह इतर महाराष्ट्रातील सर्वेक्षण अहवाल 25 ऑगस्टला उद्धव ठाकरेंकडे सादर केले जाणार आहेत.

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचं 'मिशन मुंबई'! ३६ विधानसभा मतदार संघांसाठी जोरदार फिल्डिंग; १८ नेत्यांकडे दिली मोठी जबाबदारी
Maharashtra Politics : भाजप 400 पार गेला असता तर मोदींनी 3 गोष्टी नक्कीच घडवून आणल्या असत्या; 'सामना'तून टीका

या नेत्यांची झाली नियुक्ती!

विनायक राऊत : वरळी, दादर- माहीम

अनिल देसाई: जोगेश्वरी आणि अंधेरी

अनिल परब: मागाठाणे, दहिसर

राजन विचारे: विलेपार्ले, कालिना

मिलिंद नार्वेकर: दिंडोशी, गोरेगाव

⁠सुनील प्रभू : मुलुंड, भांडुप

अजय चौधरी: चेंबूर, अणुशक्तीनगर

सचिन अहिर: कुलाबा, मुंबा देवी

विलास पोतनीस: शिवडी आणि मलबार हिल

⁠वरून सरदेसाई: सायन कोळीवाडा, धारावी

विनोद घोसाळकर: वडाळा, भायखळा

अमोल कीर्तिकर: घाटकोपर , मानखुर्द-शिवाजीनगर

रमेश कोरगांवकर: बोरीवली, कांदिवली

मनोज जामसुतकर: चारकोप, मालाड

Maharashtra Assembly Election: उद्धव ठाकरेंचं 'मिशन मुंबई'! ३६ विधानसभा मतदार संघांसाठी जोरदार फिल्डिंग; १८ नेत्यांकडे दिली मोठी जबाबदारी
Bengaluru Crime: अनैतिक संबंधांच्या संशयातून भयंकर कांड! मुलाच्या डोळ्यादेखत बायकोची हत्या; फरार पतीचा मृतदेह आढळला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com