Ladki Sun Yojana: लाडकी सून योजना सुरू करा, दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नीची मागणी

Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana: राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूपच चर्चेत आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी सून योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
लाडकी सून योजना सुरू करा, दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नीची मागणी
Kiran Walse PatilSaam tv
Published On

राज्यात सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना खूपच चर्चेत आहे. अलीकडेच राज्य सरकारने ही योजना आणली असून याला राज्यातून मोठ्या प्रमाणात महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता याच पार्श्वभूमीवर राज्यात लाडकी सून योजना सुरू करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नी किरण वळसे पाटील यांनी ही मागणी केली आहे. राज्यात लाडकी बहीण योजना आणली, तशीच लाडकी सून योजना सुरू करा, अशी मागणी त्यांनी केली. एका शासकीय कार्यक्रमात बोलताना त्या असं म्हणाल्या आहेत.

लाडकी सून योजना सुरू करा, दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नीची मागणी
Sawantwadi News : क्रुरतेचा कळस! विदेशी महिलेला घनदाट जंगलात ३ दिवस ठेवलं बांधून; दृश्य पाहून पोलीसही गेले चक्रावून

किरण वळसे पाटील म्हणाल्या की, प्रत्येक महिला ही सुनेच्या भुमिकेत आहे, त्या सुनेचं दुःख कोणाला काळात नाही. त्यामुळे आता लाडकी बहिण योजनेनंतर लाडकी सून योजना सुरू करावी. याचा फायदा प्रत्येक महिलेला होईल, असं त्या म्हणाल्या.

लाडकी बहिण योजना महाराष्ट्राला आर्थिक तुटीकडे नेणारी: यशोमती ठाकूर

दरम्यान, काँग्रेसच्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी लाडकी बहीण योजेनवर टीका केली आहे. लाडकी बहिण योजना ही एक चुनावी जुमला असून महाराष्ट्राला आर्थिक तुटीकडे घेऊन जाणारी आहे, अशी टिका यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

लाडकी सून योजना सुरू करा, दिलीप वळसे पाटील यांच्या पत्नीची मागणी
Kolhapur Flood : 98 बंधारे पाण्याखाली, 147 मार्ग बंद; कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची A टू Z माहिती फक्त 'साम'वर

लाडकी बहीण या योजनेवरून मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयामध्ये समन्वयाचा अभाव आहे. अर्थ विभागाने या योजनेला आर्थिक निधीची तरतूद परवडणारी नसल्याचे स्पष्ट केले आहे या योजनेमुळे मुख्यमंत्री आणि अर्थ मंत्रालयामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे समोर आले आहे, असं यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com