Sawantwadi News : क्रुरतेचा कळस! विदेशी महिलेला घनदाट जंगलात ३ दिवस ठेवलं बांधून; दृश्य पाहून पोलीसही गेले चक्रावून

Sawantwadi Foreign women News/Sindhudurg News : सावंतवाडी रोणापाल सोनुर्ली गावातील एका विदेशी महिलेला ३ दिवस लोखंडी सळ्यांनी बांधून ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी तिची आज सुटका केली.
Sawantwadi News
Sawantwadi NewsSaam Digital
Published On

सावंतवाडी रोणापाल सोनुर्ली गावानजीक एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोनुर्ली गावाच्या मध्यभागी असलेल्या कराडीच्या घनदाट जंगलात विदेशी महिलेला लोखंडी साखळ्यांनी बांधून ठेवलं होतं. दोन तीन दिवस बांधून ठेवल्यामुळे तीची प्रकृतीही खालावली आहे. दरम्यान आज शेकऱ्यांना ओरडण्याचा आवाज आल्यामुळे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी महिलेची सुटका केली आहे.

ही घटना आज सकाळी सोनुर्ली येथील गुराखी व शेतकऱ्यांच्या निदर्शनास आली. घनदाट जंगलात या महीलेला दोन ते तीन दिवस बांधून ठेवल्याचे बोलल जात आहे. मात्र दोन्ही गावाच्या मध्यभागी असलेल्या जंगलात जाण्यासाठी रस्ता नसतांना एवढ्या आतमध्ये तिला कसे व कोणी आणले हा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्या भागात गेलेल्या शेतकरी व गुराख्यांना कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आल्याने त्यांनी जंगलात जाऊन पाहणी केली असता हा प्रकार उघड झाला. दरम्यान याबाबत पोलिसांना कल्पना दिल्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली. सध्या तीला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचार सुरू आहेत. तसंच हे कृत्य कोणी केलं याचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत आहे.

Sawantwadi News
Mega Block : पुणे रेल्वेकडून ४ दिवस मेगाब्लॉक; 20 ट्रेनचे मार्ग बदलले, अनेक ट्रेन रद्द

विदेशी पर्यंटकांची गोव्यात पर्यंटनासाठी मोठी वर्दळ असते, गोव्याला लागूनच सिंधुदुर्ग आहे या भागाचंही विदेशी पर्यटकांना आकर्षण असतं. त्यामुळे पर्यटक या भागातही येत असतात. मात्र हल्ली विदेशी पर्यटकांवर हल्ले वाढले आहेत. गोव्यातही काही घटना घडल्या आहेत. दरम्यान सावंतवाडीत घडलेल्या या प्रकारामुळे सर्व स्तरातून संताप व्यक्त होत आहे. पीडित महिलेची प्रकृती अत्यंत अशक्त आहे. त्यामुळे हा प्रकारामागे नेमकं कोण आहे याचा शोध पोलिसांकडून घेत आहेत.

Sawantwadi News
Kolhapur Flood : 98 बंधारे पाण्याखाली, 147 मार्ग बंद; कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीची A टू Z माहिती फक्त 'साम'वर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com