Manikrao Kokate Saam TV news Marathi
महाराष्ट्र

Manikrao Kokate: कृषीमंत्री कोकाटेंवर कारवाईची टांगती तलवार? राजीनाम्याचं काऊंटडाऊन सुरू? CM दिल्ली दौऱ्यावर, नेमकं काय घडलं?

Agriculture Minister Manikrao Kokate: शेतकऱ्यांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि सभागृहात रमी खेळल्यामुळे टीकेचे धनी ठरलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Bhagyashree Kamble

माणिकराव कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि वर्तनामुळे त्यांचं मंत्रिपद धोक्यात.

फडणवीस दिल्ली दौऱ्यावर असताना भाजप नेत्यांशी मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा झाल्याची शक्यता.

शरद पवार गट आणि अजित पवार कोकाटेंच्या राजीनाम्यावर आग्रही.

सोमवारी किंवा मंगळवारी कोकाटेंशी अजित पवार चर्चा करणार.

शेतकऱ्यांविषयी वारंवार वादग्रस्त वक्तव्य करणारे आणि सभागृहात रमी खेळल्यामुळे टीकेचे धनी ठरलेले राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या कृषीमंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचं बोललं जात आहे. सध्या, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेले दोन दिवस दिल्लीच्या दौऱ्यावर असून, त्यांनी तेथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपच्या काही वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली आहे. यामुळे कोकाटेंच्या मंत्रिपदाची उचलबांगडी होणार का? यावर सध्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शनिवारी कोकाटेंनी नंदुरबारमधील शनी मंदिरात जाऊन दर्शन घेतल्याचंही समोर आलं आहे.

महायुतीतील अनेक नेते अलीकडच्या काळात वादात सापडले होते. काहींवर गंभीर आरोप झाले आहेत. शिवसेनेच्या सामनातील लेखातून काही मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यामुळे मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवाय, विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांच्या जागी सुधीर मुनगंटीवार यांची वर्णी लागणार असल्याचा दावाही यातून करण्यात आला होता. राहुल नार्वेकरांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, फडणवीस दिल्ली दौऱ्यामध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची कुठलीही चर्चा झालेली नसल्याची माहिती आहे. मात्र, कोकाटेंकडून कृषीमंत्रिपद काढून घेतले जाईल, अशी माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे कोकाटेंच्या अडचणीत आणखी वाढ होणार असल्याचं समजतंय.

शनिवारी रात्री कोकाटेंच्या राजीनाम्यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री सुनील तटकरे यांच्यात बैठक झाली. शरद पवार गटाकडूनही कोकाटेच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. आज शरद पवार आणि फडणवीसांची बैठक होणार आहे. यावेळी कोकाटेंच्या राजीनाम्याबाबत मुद्दा उपस्थित होण्याची शक्यता आहे.

अजित पवारांनी यापूर्वीही कोकाटेंच्या वादग्रस्त वक्तव्यांवर टोला लगावला होता. "याआधी दोन वेळा समज देऊनही कोकाटेंनी इजा-बिजा करत शेवटी तिजाची वेळ आणलीच" दरम्यान, अजित पवार सोमवारी किंवा मंगळवारी कोकाटेंशी प्रत्यक्ष चर्चा करणार असल्याचेही समजते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : म्हाडा मुंबई मंडळाच्या ८४ अनिवासी गाळ्यांच्या ई-लिलावाला मुदतवाढ

IND vs NZ 1st T20: पहिल्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडचा फडशा पाडला, मालिकेत 1-0 ने आघाडी

धावत्या लोकल ट्रेनमध्ये चोरट्याने बदलापूरच्या तरुणाला धक्का दिला; चाकाखाली आल्याने पायाचे तुकडे, डोक्यालाही दुखापत

Daldal Trailer Out: नुसती कापाकापी! हिंसा पाहून अंगावर येईल काटा, थरकाप उडवणारा ‘दलदल’चा ट्रेलर प्रदर्शित

Thursday Horoscope : तुमच्याविरुद्ध कोणीतरी कट रचण्याची शक्यता; ५ राशींच्या लोकांना सावध निर्णय घ्यावा लागणार

SCROLL FOR NEXT