TMC पक्ष कार्यालयात नेलं अन् विवस्त्र करून व्हिडिओ..भाजप महिला नेत्याचा गंभीर आरोप; परिसरात खळबळ

BJP Woman Leader Alleges Threats: पश्चिम बंगालमधील राजकारणाला धक्का देणारी घटना! तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर गंभीर आरोप. बर्दवान जिल्ह्यात महिला सदस्यांना धमक्या, अपहरण व अत्याचाराची भीती निर्माण.
TMC Workers Threaten BJP Women
TMC Workers Threaten BJP WomenSaam TV News
Published On

पश्चिम बंगालच्या बर्धवान जिल्ह्यातील देबोत्तर भागात तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांवर पक्ष कार्यालय उभारण्यासाठी जबरदस्तीने मालमत्ता ताब्यात घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या एका महिला नेत्याने ही बाब माध्यमांसमोर मांडली. त्या आरोपांनंतर संबंधित महिला नेत्याला अपहरण आणि बलात्काराच्या धमक्या मिळाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. केवळ भाजप महिला नेता नाही तर, आणखी एका महिलेलाही अशाच प्रकारे धमकावण्यात आल्याचा आरोप आहे.

पीडित महिला भाजप पंचायत सदस्य असून, त्यांनी केलेल्या आरोपानुसार त्यांना सर्वात आधी तृणमूल पक्षाच्या स्थानिक कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर त्यांना निर्वस्त्र करण्यात आले आणि त्यांचा व्हिडिओ शूट करत बलात्काराची धमकी देण्यात आली. भाजप महिला सदस्यानं हे थेट आरोप तृणमूल नेते आणि कार्यकर्त्यांवर केले आहे.

TMC Workers Threaten BJP Women
IT पार्क राज्याच्या बाहेर चाललंय, आपलं वाटोळं झालंय; पहाटे अजित दादा हिंजवडी दौऱ्यावर, सरपंचांनाही सुनावलं

ही संपूर्ण घटना लक्ष्मीनारायण जीऊ देवोत्तर ट्रस्टच्या २४ बिघा जमिनीच्या वादाशी संबंधित आहे. आरोपानुसार, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ही जमीन बळजबरीने ताब्यात घेतली असून, त्यावर पक्ष कार्यालय उभारण्यात आले आहे. याला विरोध करणाऱ्या महिलेला धमक्या दिल्या गेल्या. तिने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, तिला जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली.

TMC Workers Threaten BJP Women
योग केंद्रातून बाहेर येताच छातीत कळ; पायऱ्यांवर आला हार्ट अटॅक, जागीच मृत्यू; CCTV व्हायरल

या धमक्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे स्थानिक नेते विश्वजित सेन आणि कृष्णा मंडल यांच्या विरोधात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, आरोपी नेते विश्वजित सेन यांनी हे आरोप फेटाळून लावत, भाजपकडून राजकीय हेतूने बदनामी केली जात असल्याचा दावा केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com