एलपीजी गॅस बुकिंगचे नियम बदलले नाही
२५ दिवसात करता येणार दुसरा गॅस बुक
PIB ने दिली माहिती
एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर एलपीजी गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिकांनी एजन्सीसमोर लांबच लांब रांगा लावल्या आहेत. एलपीजी गॅस बुकिंगच्या नियमातदेखील बदल करण्यात आले होते. २५ दिवसानंतरच दुसरा गॅस बुक करता येणार असे नियम सरकारने लावले होते. यानंतर एलपीजी गॅस बुकिंगच्या कालावधीत वाढ केल्याची बातमी व्हायरल होत आहे. आता २५ दिवस नाही तर ३५ दिवसानंतर गॅस बुक करता येणार असं वृत्त समोर आले आहे. मात्र, ही माहिती खोटी आहे.
पीआयबीने एलपीजी गॅस बुकिंगबाबतचे हे वृत्त खोटं असल्याचे सांगितले आहे. गॅस बुकिंगच्या नियमात कोणताही बदल न केल्याचे स्पष्ट केले आहे. पीआयबीने म्हटलंय की, २५ दिवसानंतरच तुम्हाला गॅस बुक करता येणार आहे. ३५ दिवसानंतर गॅस बुकिंगच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका.
पीआयबीने नेमकं काय म्हटलं? (PIB Fact Check of LPG Gas Booking Timings)
पीआयबीने सांगितले की,सरकारच्या असं निदर्शनास समाज माध्यमांवर अशी माहिती दिली जात आहे की, एलीपीजी गॅस बुकिंगच्या कालावधीत बदल करण्यात आली आहे.त्यात म्हटलंय की, पीएम उज्जवला योजनेचा लाभ घेणाऱ्यांसाठी ४५ दिवसांनी सिलेंडर बुक करता येणार आहे. एकल सिलेंडर जोडणीसाठी २५ दिवस आणि दुहेरी सिलेंडर जोडणीसाठी ३५ दिवसांचा वेळ लागेल, असा दावा करण्यात आला आहे. मात्र, हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे.
याबाबत सरकारने माहिती दिलेली आहे. एलपीजी गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमात कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. सध्या रिफिल बुकिंगचा कालावधी हा आधीप्रमाणेच असणार आहे. शहरी भागांसाठी २५ दिवस तर ग्रामीण भागांमध्ये ४५ दिवसांचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही चुकीच्या माहितीवर विश्वास ठेवू नये.एलपीजी सिलेंडर मिळवण्यासाठी अनावश्यक किंवा घाबरुन न जाता बुकिंग करणे टाळावे, असं सरकारने सांगितलं आहे. देशात एलपीजीचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे काळजीचे कारण नाही, असंही सरकारने सांगितले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.