LPG Shortage: एलीपीजी सिलिंडर मिळेना, कर्जात बुडाला; नैराश्यात हॉटेल मालकाने आयुष्य संपवलं

karnataka shocking : गॅस मिळत नसल्याने हॉटेल मालकाने आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. हॉटेल मालकाच्या आत्महत्येने व्यावसायिकांमध्ये शोककळा पसरली आहे.
karnataka shocking
karnatakaSaam tv
Published On
Summary

कर्नाटकच्या बेळगावात घडली खळबळजनक घटना

कर्जात बुडालेल्या हॉटेल मालकाने आयुष्य संपवलं

हॉटेल व्यावसायिकांकडून शोक व्यक्त

कर्नाटकच्या बेळगावमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जात बुडालेल्या हॉटेल मालकाने आयुष्य संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. एलपीजी सिलिंडर मिळत नसल्याने अनेक दिवसांपासून हॉटेल बंद होते. त्यामुळे कमाईचे साधन गमावलेल्या हॉटेल मालकाने त्याच्या हनुमान हॉटेलमध्येच आयुष्य संपवलं. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

'एनडीटीव्ही' च्या रिपोर्टनुसार, हॉटेल मालकाच्या मुलाने सांगितलं की, हॉटेल बंद असल्याने कुटुंब आर्थिक समस्यांशी झगडत होतं. गॅस सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेलमध्ये जेवण तयार करता येत नव्हतं. गॅस सिलिंडर नसल्याने आम्ही चुलीवर जेवण तयार करण्याची योजना आखत होतो. परंतु गॅस सिलिंडर मिळत नसल्याने वडील तणावात होते. याचदरम्यान वडिलांनी हॉटेलमध्ये आयुष्य संपवलं'.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहोत. हॉटेलमध्ये एलपीजी सिलिंडरचा वापर केला जात होता. आम्हाला हॉटेलमध्ये जेवण बनवण्यासाठी आठ दिवसामागे एक सिलिंडर लागायचा. त्यात त्यांना सिलिंडर मिळत नव्हता. त्यामुळे नैराश्यात येऊन आत्महत्या केल्याची शक्यता आहे. परंतु नेमकं कोणत्या कारणाने आत्महत्या केली, हे अंतिम तपासानंतरच स्पष्ट होईल'.

karnataka shocking
Jaggery Sweet Recipes : गोड खाण्याची खूप इच्छा होतंय? वाटीभर गुळाची बनवा 'ही' रेसिपी, जिभेवर चव रेंगाळत राहील

तत्पूर्वी, कर्नाटकात सोमवारी व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा वाढवण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता साठ्यात वाढीव व्यावसायिक सिलिंडर जमा झाले आहेत. एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बेंगळूरूमध्ये गॅस कंपन्या आणि हॉटेल असोशिएशनचे प्रतिनिधी आणि अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मंत्र्यांची एक बैठक झाली. या बैठकीत मंत्र्यांनी गॅस पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आलं.

karnataka shocking
₹५०० चा गॅस फुकटात मिळणार, १ लाखाचं बक्षीसही मिळणार, पण कुणाला? वाचा काय आहे बंपर योजना

हॉटेल मालकाच्या आत्महत्येने त्यांच्या कुटुंबाव दु:खाचा डोंगर कोसळला आहे. हॉटेलमध्ये दररोज येणाऱ्या ग्राहकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com