Jaggery Sweet Recipes : गोड खाण्याची खूप इच्छा होतंय? वाटीभर गुळाची बनवा 'ही' रेसिपी, जिभेवर चव रेंगाळत राहील

Shreya Maskar

गोड पदार्थ

तुम्हाला जर गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट गुळाची लापशी बनवा. हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडेल. त्यामुळे नक्की ट्राय करा.

Jaggery Sweet Recipes | yandex

गुळाचे पोषक घटक

गुळामध्ये भरपूर पोषक घटक असतात. यात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस आणि अनेक जीवनसत्त्वे आहेत. तसेच अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असते.

Jaggery Sweet Recipes | yandex

गुळाची लापशी

गुळाची लापशी बनवण्यासाठी गव्हाचा भरडा(दलिया), गूळ, साजूक तूप, गरम पाणी, वेलची पूड, सुकामेवा (काजू, बदाम, मनुके) आणि खोबऱ्याचे काप इत्यादी साहित्य लागते.

Jaggery Sweet Recipes | yandex

गव्हाचा भरडा

गुळाची लापशी बनवण्यासाठी कुकरमध्ये तूप गरम करून त्यात गव्हाचा भरडा मंद आचेवर खमंग शिजवून घ्या.

Jaggery Sweet Recipes | yandex

गरम पाणी

शिजलेल्या मिश्रणात गरम पाणी घालून लापशी मऊ होईपर्यंत मिक्स करा. २-३ मिनिटे चांगली ढवळून घ्या.

Hot Water | yandex

गूळ

एका पॅनमध्ये तूप टाकून त्यात गूळ चांगला विरघळून घ्या. सतत ढवळत राहा. गुळाच्या गुठळ्या होणार, नाही याची काळजी घ्या. गॅस कमी आचेवर ठेवून द्या.

Jaggery | yandex

वेलची पूड

त्यानंतर मिश्रणात वेलची पूड, आवडीनुसार सुकामेवा आणि तुपावर परतलेले खोबरे घालून मिक्स करा. यामुळे रेसिपीला चांगला सुगंध येतो.

Cardamom Powder | yandex

गुळाचे उन्हाळ्यात होणारे फायदे

गुळामुळे पचनक्रिया सुधारते, भरपूर ऊर्जा मिळते आणि डिहायड्रेशन टाळण्यास मदत होते. त्यामुळे उन्हाळ्यात याचे नक्की सेवन करा.

Jaggery Sweet Recipes | yandex

NEXT : हिरव्यागार द्राक्षाचे आंबट-गोड लोणचे, मिळमिळीत जेवणाला येईल चव

Grapes Pickle Recipe | saam tv
येथे क्लिक करा...