Shreya Maskar
सध्या बाजारात द्राक्ष पाहायला मिळत आहे. हिरव्यागार, आंबट-गोड द्राक्षाचे चटपटीत लोणचे बनवा. ही रेसिपी लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल.
द्राक्षाचे लोणचे बनवण्यासाठी द्राक्ष, हिरवी मिरची , व्हिनेगर, बडीशेप, मेथी, काळे तीळ, तिळाचे तेल, मीठ इत्यादी साहित्य लागते.
द्राक्षाचे लोणचे बनवण्यासाठी सर्वप्रथम द्राक्षे धुवून पुसून घ्या. त्यानंतर मधोमध काप करून एका भांड्यात ठेवा.
पॅन गरम करून यात तेल घाला. त्यानंतर आलं - हिरवी मिरची पेस्ट, व्हिनेगर , बडीशेप, मेथी दाणे आणि काळे तीळ घालून वाटून घ्या.
एका बाउलमध्ये कापलेले द्राक्ष, हिरवी मिरचीचा तयार मसाला, चवीनुसार मीठ आणि लोणच्याचा मसाला मिक्स करून घ्या. लोणचे मुरण्यासाठी २-३ दिवस ठेवून द्या.
लोणचे एका हवाबंद काचेच्या जारमध्ये स्टोर करा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्या. जेणेकरून ते जास्त वेळ टिकेल. गरमागरम चपाती आणि भातासोबत द्राक्षाचे लोणचे खा.
द्राक्षे हे पौष्टिक फळ असून, त्यामध्ये व्हिटॅमिन सी, के आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. यामुळे त्यांचे सेवन आवर्जून करा.
द्राक्षे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, रक्ताभिसरण सुधारते, पचनसंस्था मजबूत राहते. तसेच आपली त्वचा ग्लो करते.