Shreya Maskar
सकाळी पोटभर नाश्ता केला की संपूर्ण दिवस जास्त भूक लागत नाही. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट हेल्दी आप्पे बनवा.
आप्पे बनवण्यासाठी तांदूळ, साबुदाणा , आले , पनीर , चीज, गाजर , हिरवी मिरची, सैंधव मीठ , जिरे, तेल , कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
आप्पे बनवण्यासाठी सर्वप्रथम भिजवलेला तांदूळ, साबुदाणा आणि आलं एकत्र मिक्सरला वाटून गुळगुळीत मिश्रण तयार करा.
त्यात हिरव्या मिरच्या आणि सैंधव मीठ घाला. आवश्यकतेनुसार थोडे पाणी घालून मिश्रण थोडा वेळ बाजूला ठेवा म्हणजे ते व्यवस्थित घट्ट होईल.
यानंतर किसलेले चीज, पनीर आणि हिरवी कोथिंबीर घालून चांगले मिक्स करा. तुम्ही यात चिली फ्लेक्स देखील टाकू शकता.
आप्पे पात्राला तेल लावून गरम करा. पात्रात तयार पीठ घालून मंद आचेवर शिजवा. आप्पे दोन्ही बाजूंनी गोल्डन फ्राय करा.
कुरकरीत आप्पे एका ताटात काढून चटपटीत पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या. ही रेसिपी टिफिनसाठी देखील परफेक्ट आहे.
पनीर आणि चीज हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचा उत्तम स्रोत आहेत. जे हाडे मजबूत करणे, वजन नियंत्रित करणे आणि स्नायूंच्या विकासासाठी फायदेशीर आहेत.