Shreya Maskar
बदाम शेक बनवण्यासाठी भिजवलेले बदाम, फुल-क्रीम दूध, वेलची पूड, केशर, मिल्क पावडर, काजू, पिस्ता, कंडेन्स्ड मिल्क इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.
बदाम शेक बनवण्यासाठी रात्री बदाम भिजवून ठेवा. दुसऱ्या दिवशी त्यांची साल काढून मिक्सरला वाटून घ्या. यात तुम्ही थोडे दूध टाकू शकता.
आता पॅनमध्ये थोडे दूध टाकून चांगले उकळून घ्या. दुधाला उकळी आल्यावर त्यात बदामाची पेस्ट मिक्स करा आणि सतत ढवळत रहा. गुठळ्या होणार नाही, याची काळजी घ्या.
दुधाला छान रंग येण्यासाठी त्यात केशर, सुगंधासाठी वेलची पूड घाला. ३-४ मिनिटे दूध ढवळत रहा.
दूध घट्ट होऊ लागेल तेव्हा त्यात मिल्क पावडर घाला. यामुळे शेक अधिक घट्ट होऊन त्याला क्रीमी चव येईल. लहान मुल तर आवडीने बदाम शेकचा ग्लास संपवतीस.
यात कापलेले काजू, पिस्ता मिक्स करा. यामुळे बदाम शेकला चांगली टेस्ट येते. सर्व मिश्रण दुधात चांगले मिसळा आणि मग थोडा वेळ शिजू द्या.
यानंतर कंडेंस्ड मिल्क घाला. तुमची इच्छा असल्यास यात फक्त साखर सुद्धा घालू शकता. आता दूध घट्ट आणि क्रीमी होईपर्यंत सतत ढवळत रहा.
५ मिनिटांनी गॅस मंद करून बदाम शेक थोडा थंड करा. त्यानंतर एका ग्लासमध्ये बदाम शेक काढून त्यावर थोडे चॉकलेट सीरप आणि ड्रायफ्रूट काप टाका. त्यानंतर बदाम शेक थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ३०-४० मिनिटे ठेवून द्या.