LPG सिलिंडर बुकिंगच्या नियमांमध्ये मोठा बदल
बुकिंग कालावधी २५ वरून ३५ दिवसांपर्यंत वाढवला
डबल कनेक्शनधारकांना मोठा फटका
उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ४५ दिवसांची अट
गृहिणींसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पुन्हा एकदा गॅस कंपन्यांनी LPG सिलिंडरच्या बुकिंगशी संबंधित नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नवीन नियमांनुसार आता २५ नाही,तर ३५ दिवसांनी सिलिंडर बुकिंग करता येणार आहे. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखणे, तसेच वितरण व्यवस्थेतील पारदर्शकता वाढवणे या उद्देशाने, दोन सिलिंडरच्या बुकिंगमधील कालावधी आता वाढवण्यात आला आहे. गॅस वितरकांनी मंगळवारी या नवीन नियमाची घोषणा केली. या नियमांमुळे गृहिणींच टेन्शन वाढणार आहे.
नव्याने लागू झालेल्या नियमाचा फटका विशेषतः 'डबल-सिलिंडर कनेक्शन' असलेल्या ग्राहकांना बसणार आहे. ग्राहकांना आता, त्यांच्या १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरसाठी पुढील रिफिल बुक करण्यापूर्वी, मागील डिलिव्हरीच्या तारखेपासून ३५ दिवस वाट पाहावी लागणार आहे.
गॅस कंपन्यांनी ग्राहकांच्या विविध श्रेणींवर आधारित रिफिल बुकिंगसाठी नवीन कालमर्यादा निश्चित केल्या आहेत. प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे लाभार्थी यांना आता पुढील सिलिंडर बुक करण्यापूर्वी ४५ दिवस वाट पाहावी लागेल. तर ज्या ग्राहकांकडे केवळ एका सिलिंडरचे कनेक्शन आहे, ते आता मागील डिलिव्हरी होऊन २५ दिवस पूर्ण झाल्यानंतर नवीन सिलिंडर बुक करू शकतात. तर ज्यांचे डबल कनेक्शन आहे, त्यांना ३५ दिवसानंतर सिलिंडर बुक करता येणार आहे. यामध्ये महत्त्वाच म्हणजे, पुढील सिलिंडर बुक करण्याची पात्रता ही मागील बुकिंगच्या तारखेवर आधारित नसून, डिलिव्हरीच्या तारखेवर आधारित असणार आहे.
जर एखाद्या ग्राहकाने दिलेली मुदत पूर्ण होण्यापूर्वीच सिलिंडर बुक करण्याचा प्रयत्न केला, तर ही 'मुदतीपूर्वीची बुकिंग'प्रणालीद्वारे थांबवली जाईल आणि ती विनंती स्वीकारली जाणार नाही. या नवीन नियमाबाबत ग्राहकांना काही अडचणी आल्यास, किंवा त्यांना अधिक माहिती हवी असल्यास, ग्राहक अधिकृत टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००-२३३३-५५५ वर संपर्क साधू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.