Manasvi Choudhary
महाराष्ट्राची चंद्रा म्हणून अभिनेत्री अमृता खानविलकरची विशेष ओळख आहे.
अभिनेत्री अमृता खानविलकर ही चित्रपट, मालिका आणि डान्स यामुळे लोकप्रिय झाली. घराघरात तिची ओळख झाली आहे.
सोशल मीडियावर विविध स्टायलिश लूकमुळे अमृता खानविलकर खास चर्चेत असते नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते.
नुकतच मराठमोळा साज श्रृंगार अमृताने केला आहे. निळ्या साडीत तिचं सौंदर्य खुललं आहे.
कपाळावर टिकली, हातात बांगड्या, नाकात नथ असा तिने हा लूक पूर्ण केला आहे.
ग्लॉसी मेकअपने तिचे सौंदर्य आणखी खुलवलं. तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
अमृताच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. "खूप सुंदर", "अप्रतिम अश्या प्रतिक्रिया आल्या आहेत.