Shruti Vilas Kadam
वैदेही परशुरामी हिने मरून रंगाच्या साडीतील पारंपरिक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
या साडीत तिचं सात्विक आणि मराठमोळं सौंदर्य अधिक खुलून दिसत असून चाहत्यांना तिचा हा लूक खूप आवडला आहे.
गळ्यातील जड सोन्याचा हार आणि नाजूक नथ तिच्या लूकला खास राजेशाही टच देताना दिसत आहेत.
महाराष्ट्र दिनानिमित्त तिने हे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
या सुंदर फोटो असलेल्या पोस्ट खाली तिने महाराष्ट्रीय असे कॅप्शन दिले आहे.
या फोटोंमध्ये तिचे वेगवेगळे रुप पहायला मिळत आहेत.
वैदेहीचा हा लूक पाहून ती मराठी चित्रपटसृष्टीतील स्टाईल आयकॉन असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.