Palghar News Saam Tv
महाराष्ट्र

Palghar News: डहाणूतील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार; बालक, स्तनदा माता, गरोदर महिलांचं आरोग्य धोक्यात

Rohini Gudaghe

Palghar News Low Quality Food In Anganwadi

पालघर (Palghar) जिल्ह्यात अंगणवाड्यांमध्ये शासनाकडून बालक, स्तनदा माता, गरोदर महिलाना पुरवला जाणारं धान्य हे निकृष्ट दर्जाचं असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. डहाणू तालुक्यातील काही अंगणवाड्यांमधून काही लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारात किडे असल्याची बाब समोर आली आहे. (Latest Marathi News)

डहाणूतील अंगणवाडीत निकृष्ट दर्जाचा आहार पुरवला जात (Low Quality Food In Anganwadi) आहे. त्यामुळं बालक, स्तनदा माता आणि गरोदर महिलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे, तर परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगणवाडीतील पोषण आहारात किडे

पालघर जिल्ह्यातील कुपोषण समूळ नष्ट करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत लहान बालक, स्तनदा माता आणि गरोदर महिला यांना पोषण आहार पुरवला (Anganwadi of Dahanu) जातो. मात्र डहाणूत लाभार्थ्यांना देण्यात आलेल्या पोषण आहारातील अनेक कडधान्य सडलेली आहेत. त्यांच्यावर किड्यांचा वावर पाहायला मिळाला आहे. धान्य पुरवणाऱ्या ठेकदारावर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

त्यामुळे समाज कल्याण विभाग लहान बालक, माता आणि गरोदर महिलांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोप होता होऊ लागला (Palghar News) आहे. मात्र, निकृष्ट दर्जाचे दिलेले धान्य आम्ही परत मागवले आहे, असे सांगत समाज कल्याण विभागाकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

मागील दोन महिन्यांपासून अंगणवाडी (Anganwadi) सेविकांचा संप सुरू आहे. या काळात अंगणवाड्यांना धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराने डहाणू तालुक्यातील एका गोडाऊनमध्ये हे धान्य साठवून ठेवलं होतं. मात्र, इथूनच आता हे धान्य पुरवठा केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे धान्य सडलेलं असताना संबंधित विभाग दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे थेट पालघर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवरच आता विरोधकांनी आरोप केले आहेत.

पालघर जिल्ह्यात यापूर्वी देखील असे अनेक प्रकार ( Anganwadi Food) समोर आले आहेत, तरी देखील जिल्हा परिषद या ठेकेदारांना पाठीशी घालत आहेत, असं जिल्हा परिषद सदस्य काशिनाथ चौधरी यांनी म्हटलं आहे. आता जिल्हा परिषद धान्य पुरवठा करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

Employees Provident Fund: PF खातेधारकांसाठी मोठी बातमी; पीएफमधून काढता येणार १ लाख रुपये

Solapur News: धर्मराज काडादी यांनी विधानसभा लढवण्याची केली घोषणा, सोलापूरमधून उमेदवारीसाठी शिंदेंना घातलं साकडं?

SCROLL FOR NEXT