ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गरमीच्या दिवसात नारळ पाणी पिणे शरीरीसाठी फायदेशीर मानले जाते.
पाण्याची कमतरता दूर करण्यासाठी आणि शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी नारळ पाण्याचे सेवन करू शकता.
दररोज नारळ पाणी पिल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
नारळ पाण्यात अनेक गुणधर्म आढळतात, जे डोकेदुखीच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात.
मधुमेहींसाठी नारळपाणी पिणे फायदेशीर आहे. ते इन्सुलिनची पातळी वाढवण्यास मदत करू शकते.
दररोज नारळ पाण्याचे सेवन केल्याने तणावाची समस्या दूर राहण्यास मदत होते.
उन्हाळ्यात नारळ पाणी पिल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि संसर्ग टाळता येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे तज्ञांचा सल्ला घ्यावा.