Smartphones To Anganwadi Workers: खूशखबर! बीडमध्ये 3 हजारपेक्षा जास्त अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन

Anganwadi Workers Will Get Smartphones: बीडमध्ये अंगणवाडी सेविकांना स्मार्टफोन मिळणार आहे. 3090 सेविकांना तसेच 84 पर्यवेक्षिकांना हा मोबाइल मिळणार आहे.
Smartphones
Smartphones Google
Published On

Beed News Smartphones To Anganwadi Workers

मागील महिन्यात अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संप पुकारला होता. अखेर राज्यात ५३ दिवसांपासून सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या संपावर तोडगा निघाला आहे. अंगणवाडी सेविकांना स्मार्ट मोबाइल देण्याची मागणी शासनाने मान्य केली आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना हे मोबाइल मिळणार (Anganwadi Workers Will Get Smartphones) आहेत.  (latest marathi news)

अंगणवाडी सेविकांनी विविध संप केल्यानंतर शासनाने काही मागण्या मान्य केल्या आहेत. तसंच काही मागण्यांबाबत त्यांना आश्वस्त केलं आहे. त्यानुसार अंगणवाडी सेविकांना आता स्मार्ट मोबाइल दिला जाणार आहे. बीड (Beed) जिल्ह्यात 3090 सेविकांना तसेच 84 पर्यवेक्षिकांना हा मोबाइल मिळणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामकाजासाठी मोबाईल

अंगणवाडी सेविकांना (Anganwadi Sevika) 2018-2019 मध्ये पोषण आहार कार्यक्रमांतर्गत दैनंदिन कामकाजासाठी मोबाइल दिले होते. मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर अॅपद्वारे लाभार्थी यादी, त्यांचे वजन, हजेरी, उंची, स्तनदा माता, गर्भवती मातांची माहिती, पोषण आहाराचे वाटप आदी माहिती नोंद करावी लागत होती. अंगणवाडी सेविकांना दैनंदिन कामकाजासाठी मोबाईल दिले गेले होते.

परंतु, या मोबाईलच्या तांत्रिक तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे आंदोलन करीत अंगणवाडी सेविकांनी शासनाला मोबाईल परत केले (Smartphones To Anganwadi Workers) होते. त्यानंतर 4 डिसेंबरपासून विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाची दखल शासनाने घेतली. अखेर हा संप मिटला. दरम्यान आता अंगणवाडी सेविकांना नवा मोबाइल कधी मिळणार? याची उत्सुकता लागलेली आहे.

Smartphones
Asha Workers Strike: 'आश्वासन नको, मानधनवाढीचा जीआर काढा'; ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आशा सेविकांचं ठिय्या आंदोलन

स्मार्टफोन अंगणवाडी सेविकांसाठी फायदेशीर

अंगणवाडी सेविकांना (Anganwadi Workers) शासनाकडून देण्यात येणाऱ्या स्मार्ट फोनमध्ये अनेक ॲप नव्याने समाविष्ट करून देण्यात येणार आहेत. या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना काम करणं सोपं होणार आहे. अंगणवाडी सेविकांना कामाचा अहवाल द्यावा लागतो.

हे स्मार्टफोन (Smartphones) अंगणवाडी सेविकांसाठी फायदेशीर ठरतील, असं सांगण्यात येत आहे. शहरी अन् ग्रामीण सेविकांनाही लाभ होणार आहे. स्मार्टफोन मिळणार असल्यामुळे अंगणवाडी सेविकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

Smartphones
Asha Sevika Strike: मोठी बातमी! संभाजीनगरमधील 440 आशा स्वयंसेविकांचं तडकाफडकी निलंबन; प्रशासनाचा खळबळजनक निर्णय

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com