Anganwadi Sevika Strike : अंगणवाडी सेविका 'शाे काॅज' ला उत्तर देतील? तात्काळ कामावर हजर राहण्याचे आदेश

अंगणवाडी सेविकांना दरमहा 26 हजार आणि मदतनीसला 20 हजार रुपये मानधन द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
show cause notice issued to 2500 anganwadi sevika in amravati
show cause notice issued to 2500 anganwadi sevika in amravati saam tv
Published On

- अमर घटारे

Amravati News :

अमरावती जिल्ह्यातील अडीच हजार संपकरी अंगणवाडी सेविकांना (anganwadi sevika strike) महिला व बालकल्याण विभागाने "शो कॉज" नाेटीस बजावली आहे. या सेविकांना खुलासा सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. (Maharashtra News)

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात यावी आदी मागण्यांसाठी राज्यातील अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाने अद्याप अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत काेणताच निर्णय जाहीर केलेला नाही.

show cause notice issued to 2500 anganwadi sevika in amravati
Savitribai Phule Jayanti: नायगावात सावित्रीबाई फुलेंच्या स्मारकास शरद पवार गटाकडून दुग्धाभिषेक, भुजबळ, चाकणकरांना दर्शविला विराेध

यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस हे राज्यातील विविध जिल्ह्यात माेर्चे, आंदाेलन करत आहेत. अमरावती येथे देखील नुकताच अंगणवाडी सेविकांनी माेर्चा काढला हाेता.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविकांनी तात्काळ खुलासा देऊन कामावर हजर राहावे अन्यथा कारवाई करु अशा प्रकारची नाेटीस महिला व बालकल्याण विभागाने सेविकांना बजावली आहे.

Edited By : Siddharth Latkar

show cause notice issued to 2500 anganwadi sevika in amravati
Girni Kamgar Melava: गिरणी कामगारांसाठी शिवेंद्रराजेंचा ॲक्शनप्लान, ठाकरेंकडून फसगत : आमदार सुनील राणे

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com