ज्या मनुवादी सावित्रीबाईंना विरोध केला त्याच्या सोबत गेलेल्या छगन भुजबळ यांनी सावित्रीबाईंना अभिवादन केले. ही गाेष्ट आम्हांला मान्य नसल्याचे सांगत एनसीपी आणि मनसे कार्यकर्त्याने नायगाव येथील सावित्रीबाईंच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक घातला असा दावा केला. पाेलिसांनी दाेन्ही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील स्मारकास आज (बुधवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री छगन भुजबळ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील लाेकप्रतिनिधी उपस्थित हाेते.
दरम्यान मान्यवरांनी फुले यांना अभिवादन केल्यानंतर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे (शरद पवार गट) आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास दुग्धाभिषेक घातल्याचे माध्यमांशी बाेलताना सांगितले.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कार्यकर्ते म्हणाले छगन भुजबळ आणि रुपाली चाकणकर यांनी स्वत:च्या फायदासाठी सत्तेच्या लालसेपाेटी सावित्रीबाई फुलेंना त्रास देणा-यांसमवेत हातमिळवणी केली. आज हे लाेक येथे येऊन अभिवादन करतात हे आम्हांला पटलेले नाही. त्यामुळे आज आम्ही सावित्रीबाईंच्या स्मारकास दुग्धाभिषेक केला असे बंडू ढमाळ यांनी सांगितले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.