Savitribai Phule जयंती कार्यक्रमाच्या नियाेजनावर नितीन भरगुडे पाटलांसह ग्रामस्थ नाराज, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार

आज मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्री नायगाव खंडाळा येथे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी येणार आहेत.
nitin bhargude patil
nitin bhargude patilsaam tv
Published On

Satara News :

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या (krantijyoti savitribai phule jayanti) कार्यक्रमानिमित्त नायगाव खंडाळा (naigaon khandala) येथील स्थानिक कार्यकर्ते त्याचबरोबर ग्रामस्थांना विचारात न घेता प्रशासनाने मनमानी कारभार केला असल्याचा संताप जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील (nitin bhargude patil) यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उदय कबुले यांनी व्यक्त केला आहे. (Maharashtra News)

सातारा जिल्ह्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्मारक प्रसंगी अभिवादन करताना नितीन भरगुडे पाटील व उपस्थित ग्रामस्थांनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराला नेमकं कोण खत पाणी घालत आहे याची चौकशी व्हावी, अशी मागणी साम टीव्हीशी बाेलताना केली.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

nitin bhargude patil
Karad: 'यशवंतराव पतसंस्था' अवसायनात, इंद्रजीत मोहिते परदेशात; कराडसह वाळवातील शेतकऱ्यांच्या पैशांचे काय?

वर्षानुवर्ष ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधींना विचारात घेऊनच हा कार्यक्रम केला जातो मात्र प्रशासनाने जे मनमानी कारभार करून कार्यक्रमाचे आयोजन केले आहे याची तक्रार आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) व राज्य मंत्रिमंडळामध्ये करणार असल्याचेही जिल्हा माजी अध्यक्ष उदय कबुले व जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील यांनी साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

nitin bhargude patil
Girni Kamgar Melava: गिरणी कामगारांसाठी शिवेंद्रराजेंचा ॲक्शनप्लान, ठाकरेंकडून फसगत : आमदार सुनील राणे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com