Lonavala Crime Saam tv
महाराष्ट्र

Lonavala Crime : मुसळधार पावसात चोरट्यांनी साधला डाव; लोणावळ्यात दोन ठिकाणी चोऱ्या, सहा लाखाचा ऐवज लांबविला

Lonavala News : बाहेर मुसळधार पावसाचा हाहाकार सुरु असून या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र अशा पावसात देखील चोरटयांनी संधी साधत दोन ठिकाणी घरात प्रवेश करत लाखो रुपयांचा ऐवज लांबविला आहे

दिलीप कांबळे

मावळ : लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र या मुसळधार पावसात देखील चोरट्यांनी डाव साधत लोणावळ्याच्या भांगरवाडी येथील दोन फ्लॅटमध्ये चोरी करत रोख रक्कमेसह तब्बल पाच लाख ८७ हजार ५०० रुपयाचा सोन्याचा ऐवज चोरून नेला आहे. यामुळे खळबळ उडाली असून पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. 

लोणावळ्याच्या भांगरवाडी परिसरात वास्तव्यास असलेले योगेश कोठावदे हे आपल्या कुटुंबासह कल्याणला गेले होते. यामुळे त्यांचा फ्लॅट बंद असल्याने अज्ञात चोरट्यांनी संधी साधत फ्लॅटच्या दरवाज्याची कडी तोडून फ्लॅटमध्ये प्रवेश केला. यानंतर बेडरूम मधील लोखंडी कपाटाचे लॉक तोडले. त्यामध्ये असलेल्या सोन्याचे ऐवज व रोख रक्कम असा सुमारे पाच लाख ७७ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरला आहे. 

दुसऱ्या घटनेत १० हजाराचा मुद्देमाल लांबविला 

तर दुसरी घटना भांगरवाडीतील गोखले पार्क येथे राहणारे भरत मेंगडे यांच्या घरात देखील चोरी झाली आहे. त्यांचे घर देखील बंद असल्याची संधी साधून चोरट्यानी त्यांच्या घरातून रोख रक्कम व चांदीच्या पट्ट्या असा दहा हजार रुपयांचा मुद्देमाल चोरांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

कुटुंबीय पहिल्या माळ्यावर, चोरटयांनी केला हात साफ  

नागपूर : नागपूरच्या पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धनगर परिसरात भरदिवसा चोरीची घटना उघडकीस आली आहे. डॉ. शाम शेंडे यांच्या घरात चोरी झाली आहे. बुधवारी सकाळी पाऊस सुरू असल्यामुळे संपूर्ण कुटुंबीय घराच्या पहिल्या मजल्यावर होते. त्याच दरम्यान चोरांनी संधी साधून घरात प्रवेश केला. यात त्यांनी लॅपटॉप आणि दोन मोबाईल फोन लंपास केले. अज्ञात चोरटा घरातून बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

Chanakya Niti : खूप मोठं व्हायचंय? चाणक्यांची ही खास नीती लक्षात ठेवा, सर्व इच्छा होतील पूर्ण

Monday Horoscope : नशिबाची साथ मिळेल! 5 राशींच्या व्यक्तींची होणार चांदी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

SCROLL FOR NEXT