Jawhar Heavy Rain : अतिवृष्टीने रस्ता खचला; ५० फुटाच्या लांब भेगा, रहदारी पूर्णपणे बंद

Palghar Jawhar News : पुलाचे बांधकाम लवकरच होईल असे ग्रामस्थांना त्यावेळी आश्वासन देण्यात आले होते, मात्र एक पावसाळा उलटून दुसरा पावसाळा आला तरीसुद्धा ह्या पुलाची अवस्था जैसे थेच होती
Jawhar Heavy Rain
Jawhar Heavy RainSaam tv
Published On

फैय्याज शेख 
जव्हार (पालघर)
: पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे. अतिवृष्टीमुळे वावर वांगणी ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य रस्त्या खचल्याने रहदारीचा मार्ग पुर्णपणे बंद झाले आहेत. रूग्णालयात किंवा कामानिमित्ताने जव्हारकडे येणारा मार्ग बंद झाल्याने नागरिकांबरोबर विद्यार्थ्यांचे देखील नुकसान होत आहे. तर पिंपळशेत ग्रामपंचायत हद्दीत खरोंडा गावाचा देखील संपर्क तुटला आहे. 

पालघर जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला होता. त्या मुळे जव्हार तालुक्यात देखील मुसळधार पाऊस पडल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली. जव्हार तालुक्यातील जव्हार ते वावर वांगणी गावाकडे जाणारा रस्ता रात्री खचल्याने या मार्गावरील रहदारी पुर्णपणे बंद झाली आहे. रस्त्याला एक ते दोन फुट उंच व ५० फुट लांब भेगा पडल्याने वाहतूक बंद झाली. यामुळे नागरिकांना जव्हार रूग्णालयात तसेच विद्यार्थ्यांना आश्रमशाळा, काॅलेजला येत नसल्याने विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होणार आहे.  
 

Jawhar Heavy Rain
Nashik Accident : बाळंतपणासाठी माहेरी आली येताच घडले दुर्दैवी; रस्ता ओलांडताना ट्रकने चिरडले, मायलेकींसह जन्मापूर्वीच बाळाचाही मृत्यू

खरोंडा गावाचा संपर्क तुटला

जव्हार तालुक्यात सोमवार पासून पावसाची संततधार सुरू आहे, दरम्यान 193 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागातील पिंपळशेत ग्रामपंचायत हद्दीत खरोंडा गावातील पूल दोन वर्षापूर्वी महापुराने पाण्यात वाहून गेला होता. यंदा हा पूल सुरू होईल अशी आशा ग्रामस्थांना होती. मात्र यावर्षीही पुलाचे काम अपूर्ण राहिले होते. दरम्यान काल झालेल्या पावसात हा पूल पुन्हा वाहून गेला असून हजारो नागरिक संपर्क क्षेत्राच्या बाहेर झाले आहेत.

Jawhar Heavy Rain
Beed Rain : बीडच्या ११ तालुक्यात अतिवृष्टी; पिकांचे अतोनात नुकसान, सोयाबीनसह कपाशीवर मर रोगाचा प्रादुर्भाव

पर्यायी मार्गही पाण्याखाली 

खरोंडा गावातील लोकांना रेशनिंग आणायला ६ ते ७ कि.मी. अंतरावरून पुलावरून मार्गक्रमण करावे लागते. वाहून गेलेल्या पुलामुळे रेशनिंग कुटुंबदारांचे हाल होणार आहेत. तसेच पिंपळशेत बाजूने दुसरा पूल आहे. परंतु तो पूल देखील कमी उंचीचा असल्याने सतत पाण्याखाली बुडून ग्रामस्थांचे हाल होतात. दरम्यान जि. प. शाळा. हेदीचापाडा शाळेतील ८० टक्के विद्यार्थ्यांची संख्या हि खरोंडा गावातील आहे. बाजूच्या गावातील विद्यार्थ्यांनी खरोंडा येथे शाळेत जायचं कसे? असा प्रश्न पडला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com