Railway employee Saam
महाराष्ट्र

Nagpur : धक्कादायक! लोको पायलटची आत्महत्या, कारण काय? चौकशी होणार

Railway employee suicide cases India : नागपूर रेल्वे विभागातील लोको पायलटने रुग्णालयातच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून चौकशी सुरू असून आत्महत्येमागील कारण शोधले जात आहे.

Namdeo Kumbhar

पराग ढोबळे, नागपूर प्रतिनिधी

Railway employee suicide cases India : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील लोको पायलटनं आत्महात्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रेल्वे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच गळफास घेत आयुष्याचा दोर कापला. सुधाकर चुनारकर असे आत्महत्या केलेल्या लोको पायलटचे नाव आहे. ते चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवाशी होते. लोको पायलटने रूग्णालयातच आत्महत्या केल्यामुळे नागपूरच्या रेल्वे विभागात एकच खळबळ उडाली आहे.

रूग्णालयातच लोको पायलटने आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे रेल्वे वर्तुळात आणि कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ माजली असून हळहळ व्यक्त केली जात आहे. सुधाकर यांनी आत्महत्या का केली? याचं कारण अद्याप समोर आलेले नाही. रेल्वेकडून या घटनेची सखोल चौकशी केली जाणार आहे. सुधाकर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण काय? हे शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.

सुधाकर चुनारकर हे काही दिवसांपूर्वी बाथरूममध्ये पडून जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण शुक्रवारी उपचारादरम्यान सुधाकर चुनारकर यांनी रुग्णालयातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच विभागीय रेल्वे व्यवस्थापक रुग्णालयात दाखल झाले. सुधाकर यांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. परिस्थितीचा आढावा घेत या घटनेची चौकशी केली जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सुधाकर चुनारकर यांनी घरगुती कारणामुळे आत्महत्या केली की कामाच्या ठिकाणाचं काही कारण आहे? याचा शोध घेतला जात आहे.

एक कर्तव्यदक्ष लोको पायलट म्हणून सुधाकर चुनारकर यांची ओळख होती. त्यांच्या मृत्यूची बातमी समजताच रेल्वे कर्मचारी संघटना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शोक व्यक्त केलाय. दुखापतीमुळे ते मानसिक तणावात होते का, की यामागे अन्य काही वैयक्तिक कारण आहे, याचा तपास आता रेल्वे पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT