Sharad Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar: गणित जुळवलं असतं तर तिन्ही उमेदवारांचा विजय झाला असता; शरद पवारांचं खळबळजनक विधान

Sharad Pawar On Vidhan Parishad Election : विधानपरिषदेत महाविकास आघाडीच्या एका उमेदवाराला पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव मतांचं गणित न जुळवल्यानं आल्याचं विधान शरद पवार यांनी केलंय.

Bharat Jadhav

राज्यातील लोकसभा निवडणुकीत महायुतीला धोबीपछाड देणाऱ्या महाविकास आघाडीला विधानपरिषदेत मोठा फटका बसला. विधानपरिषदेत उद्धव ठाकरे यांनी मतांचे गणित जुळत नसतानाही तिसरा उमेदवार मैदानात उतरवला होता, त्यामुळे जयंत पाटलांचा पराभव झाल्याचं विधान शरद पवार यांनी केले आहे.

शरद पवार पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी विधानपरिषदेत मविआचा पराभव का झाला याचे गणित समजावून सांगितले. विधानपरिषदेसाठी उमेदवार देतांना उद्धव ठाकरेंनी गणित न जुळवता तिसरा उमेदवार दिला. त्यामुळे शेकाप पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा पराभव झाला. दरम्यान मंगळवारी शेकाप नेते जयंत पाटील यांनी भरसभेत आपली खदखद व्यक्त केली होती. एका कार्यक्रमात बोलतांना ते भावूक झाले होते.

विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या निकालाबाबत बोलतांना शरद पवार म्हणाले, जयंत पाटील यांच्या उमेदवारी संदर्भात आमचा एकत्रित निर्णय झाला नव्हता. काँग्रेस , राष्ट्रवादी,शिवसेना असा एकत्र निर्णय झाला नव्हता. लोकसभा निवडणुकीत, डावे, शेकाप यांना जागा देणे शक्य झाले नव्हते. त्यामुळे त्यांना पुढे संधी देण्याचे ठरले. ते सर्वांनी मान्य केले. माझ्या मनात डाव्यांना कुठेतरी संधी मिळावी हे होतं. म्हणून आपण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे मते देऊ केली होती. परंतु ठाकरेंनी त्यांचा उमेदवार दिला.

काँग्रेसची दोन नंबरची मतं, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने त्यांची मते जयंत पाटलांना द्यावीत असं माझं मत होतं. तसं झालं असतं तर मविआचे तिन्ही उमेदवार जिंकले असते. असं मला वाटतं पण ते काही जमून आलं नाही. ⁠माझ्या गणिताप्रमाणे झाले असते तर, शिवसेना शेकाप असे देन्ही उमेदवार निवडून आले असते. काँग्रेसकडे जास्त मते होती. माझे गणित वेगळे होते. काँग्रेसने एक नंबरची सर्व मते घ्या. दोन नंबरच्या मतात निम्मी मते शेकापला द्या, असं आपलं गणित होतं. परंतु कोणी कोणाला फसवले नाही. फक्त स्ट्रॅटेजी चुकल्याचं शरद पवार यावेळी म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : त्र्यंबकेश्वर मंदिरात परप्रांतीय भाविकांचा राडा, दरवाजावर लाथा मारत गोंधळ घातला

Watch Video : राहुल गांधींचा व्होट चोरीवरुन निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा!

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

Vivo T4 Pro भारतात लवकरच होणार लाँच, ५०MP कॅमेरा अन् खास फीचर्स, किंमत किती?

Weather Update : पावसाचा जोर वाढला! मुंबई, ठाणे, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना अलर्ट जाहीर, वाचा आजचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT