Latur Crime News  Saam Tv
महाराष्ट्र

Latur News: एकाच कुटुंबातील तिघांची सामूहिक आत्महत्या, एकाच चितेवर तिघांवर अंत्यसंस्कार

Father Mother And Daughter End Life In Parbhani: लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील किनी - कद्दू इथल्या रहिवासी शिक्षक कुटुंबाने परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे रुळावर झोपून सामूहिक आत्महत्या केली होती.

Priya More

लातूरच्या अहमदपूर तालुक्यातील शिक्षक कुटुंबाने सामूहिक आत्महत्या करत जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली होती. तिघांनी देखील रेल्वे रुळावर झोपून आत्महत्या केली. या तिघांच्या देखील मृतदेहांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली होती. या तिघांच्या देखील आत्महत्येच कारण अद्यापही अस्पष्टच आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील किनी - कद्दू इथल्या रहिवासी शिक्षक कुटुंबाने परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड रेल्वेस्थानकाजवळील रेल्वे रुळावर झोपून सामूहिक आत्महत्या केली होती. गंगाखेड येथील खासगी शाळेत कार्यरत असलेले शिक्षक मसनाजी तुडमे आणि त्यांची पत्नी आणि एक मुलगी या तिघांचा मृतदेह गंगाखेड जवळच्या धारखेड परिसरात रेल्वे रुळावर आढळल्याने एकच खळबळी उडाली होती.

आत्महत्या करणारे मसनाजी तुडमे हे गंगाखेड शहरातील ममता कन्या माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते. मसनाजी, त्यांची पत्नी रंजना आणि २१ वर्षांची मुलगी अंजली या तिघांनी रेल्वे रूळावर झोपून आत्महत्या केली. गंगाखेड रेल्वे स्टेशनपासून परभणीकडे जाणाऱ्या रेल्वे रूळावर ते झोपले होते. त्याचवेळी त्यांच्या गंगावरून कोळसा वाहतूक करणारी मालगाडी गेली. या घटनेत तिघांचाही जागीच मृत्यू झाला होता.

दरम्यान या तिघांच्याही आत्महत्याचे नेमके कारण काय याचा तपास पोलिस करत आहेत. हे तिघेही काही संकटात होते का? त्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता का या सर्व बाजूने पोलिस तपास करत आहेत. तर या तिघांचा मृतदेह त्यांच्या मूळ गावी आणून एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या सामूहिक आत्महत्येमुळे ते राहत होते त्या गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

SCROLL FOR NEXT