Sharad Pawar: मोदी साहेबांचं धोरण देशाच्या हिताचं नाही; ९ महिन्यात ९५० शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शरद पवारांची टीका

Sharad Pawar: छत्रपती संभाजीनगरमधील गंगापूर येथील सभेत बोलताना शरद पवार यांनी मोदींवर टीका केली.
Sharad Pawar
Sharad Pawar
Published On

आज शेतकऱ्यांची अवस्था गंभीर आहे. सगळ्या पिकांच्या किमती कमी झाल्या आहेत. गेल्या ९ महिन्यात ९५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असं म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. ते छत्रपती संभाजीनगर मधील गंगापूर येथील प्रचारसभेत बोलत होते.

विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात शरद पवार गटाकडून सतिश चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांनी घेतलेल्या सभेतून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टीका केली. लोकसभा निवडणुकीच्यावेळी पंतप्रधान लोकसभेला ४०० जागा द्या असे म्हणत होते. तर त्यांचे सहकारी सांगत होते की ४०० जागा मिळाल्या तर देशाची घटना बदलण्यात येईल. त्यांना जनतेने फक्त १६ जागा जिंकून दिल्या.

कारण मोदी साहेबांचे धोरण देशाच्या हिताचे नव्हते. त्यामुळे त्यांचा पराभव लोकांनी केला. तर जनतेने संविधानातील बदल करण्याचा डाव ओळखला आणि आमचे ३१ खासदार निवडून दिले.

Sharad Pawar
Amit Shah : महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असणार? अमित शहा यांनी केला मोठा खुलासा

गेल्या नऊ महिन्यात 950 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली, शेतकरी का आत्महत्या करीत आहेत. केलेला खर्च निघत नाही. शेतकरी कर्जबाजारी होतो आणि आत्महत्या करत असतात, असं शरद पवार म्हणाले. माझ्याकडे शेती खात्याचा काम होतं, त्यावेळी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती मला मिळाली. मी मनमोहन सिंग यांना सांगितले होते आणि सांत्वन करून आत्महत्येचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यांना भेटलो, त्यांची पत्नी रडत होती.

Sharad Pawar
Jharkhand Assembly : काँग्रेसकडून जाती-जातीचं राजकारण; झारखंडमध्येही मोदींनी दिला 'एक है तो सेफ है' चा नारा

आणि ती म्हणाली कर्ज घेतले पीक लावले, खर्च केला मात्र पीक उद्ध्वस्त झालं. दुसऱ्या वर्षी तीच परिस्थिती झाली. कर्ज फेडता येत नाही म्हणून त्या शेतकऱ्याने आत्महत्या केली, असे त्या महिलेने सांगितले. तीच परिस्थिती सध्या आहे. शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे. या सरकारकडून सत्ता काढून घेतली पाहिजे. आता काहीही झालं तरी काहीही झालं तरी यांच्या हातात असलेली महाराष्ट्रातील सत्ता काढून घ्यायची असल्याचं शरद पवार म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com