Govinda Died In Latur Saam Tv
महाराष्ट्र

Latur Govinda Death: दहीहंडीत जखमी झालेल्या आणखी एका गोविंदाचा मृत्यू, उपचारादरम्यान सोडला जीव

Govinda Died In Latur: लातूरच्या अहमदपूर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी दहीहंडी फोडताना तरुणाचा मृत्यू झाला.

Priya More

संदीप भोसले, लातूर

लातूरमध्ये दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. लातूरमधील १९ वर्षीय तरुण दहीहंडी फोडताना गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर गेल्या २ दिवसांपासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे लातूरच्या अहमदपूर शहरावर शोककळा पसरली आहे.

लातूरच्या अहमदपूर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही योद्धा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडी स्पर्धेमध्ये साठेनगर भागातील गोविंदा पथकाने सहभाग घेतला होता. या गोविंदा पथकामध्ये उदय महेश कसबे (१९ वर्षे) हा तरुण देखील होता. या गोविंदा पथकाने दहीहंडी फोडण्यासाठी थर लावले. यावेळी चौथ्या थरावरून कोसळून उदय गंभीर जखमी झाला.

जखमी झालेल्या उदयला तात्काळ लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गेल्या २ दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरू होते. उदयची प्रकृती चिंताजनक होती. डॉक्टरांनी त्याला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण उपचारादरम्यान उदयचा मृत्यू झाला. उदयच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे अहमदपूर शहरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. राज्यामध्ये आतापर्यंत २ जखमी गोविंदांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, जळगावमध्ये दहीहंडी फोडताना जखमी झालेल्या गोविंदाचा मृत्यू झाला होता. थरावर थर लावण्याच्या प्रयत्नात पाय घरसरून पडल्यामुळे नितीन चौधरी नावाचा गोविंदा जखमी झाला होता. नितीनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. नीतीन पाचोरा शहरातील रेल्वे स्टेशन रोडवरील रिक्षा स्टॉपवर आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडीमध्ये सहभागी झाला होता. नितीनच्या मृत्यूमुळे जळगावमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेसचा 80 जागांवरती दावा; 25 तारखेला पहिली यादी येणार

नागपूरच्या MIDC मधील पाण्याची टाकी कोसळली, ३ जणांचा मृत्यू, अनेकजण मलब्याखाली

RCF Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार रेल्वेत नोकरी; ५५० पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Flax seeds: स्किन-हेअर केअर आणि डायबिटीजसह 'हे' आजार होतील कायमचे दूर, रोज सकाळी एक चमचा खा 'या' बिया

Ajit Pawar : नंदुरबारला पावरफुल पालकमंत्री मिळणार? अजित पवारांच्या नावाची जोरदार चर्चा

SCROLL FOR NEXT