CM Eknath Shinde: लाडकी बहीण झाली, आता लाडका गोविंदा; टेंभी नाक्यावरून CM शिंदेंनी गोविंदांंसाठी कोणत्या घोषणा केल्या?

EM Eknath Shinde On Govinda: गोविंदा पथकातील गोविंदाचा इन्शूरन्स काढण्यात आला आहे. गोविंदांसाठी सुट्टीही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
CM Eknath Shinde
CM Eknath ShindeSaam Digital
Published On

विरोध लाडकी बहीण योजनेला विरोध करत आहेत. जनतेत चुकीची माहिती पसरवत आहे, मात्र विरोधकांनी कितीही आकांडतांडव केला तरी आता विधानसभेची हंडी आम्हीच फोडणार, असं विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यभर आज दहिहंडीचा उत्साह आहे. जिथे दहीहंडी सुरुवात झाली त्या टेंभी नाक्यावरच्या दहीहंडीचं आज शिंदेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी ते दहीहंडीसाठी जमलेल्या गोविंदांना संबोधित करत होते.

विधानसभा निवडणुका येत्या एक दोन महिन्यात होणार आहेत. सर्व पक्षांकडून जोरदार तयारी सुरू आहे. महायुती सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर विरोधकांकडून जोरदार टीका केली जात आहे. गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे राज्यातील बहिणी सुरक्षित नसतील तर योजना काय कामाची, अशी टीका होत आहे, मात्र एकनाथ शिंदे यांनी विरोधक कितीतीही आंकाडतांडव करू देत विधानसभेची दहीहंडी आपणच फोडणार असल्याचं म्हटलं आहे.

लाडकी बहीण झाली मग लाडका भाऊ पण झाला. शेतकऱ्याचं वीजबील माफ केलं. लाडक्या भावांनाही स्टायफंड देण्यात येणार आहे. आता लाडक्या गोविंदांची काळजी घेतली आहे. दहीहंडीला विशेष क्रीडा प्रकारांमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. गोविंदा पथकांमध्ये भाग घेणाऱ्या गोविंदाचा इन्शूरन्स काढला जात आहे. आता गोविंदांसाठी सुट्टीही देण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.

CM Eknath Shinde
Maharashtra Politics: शरद पवारांची हर्षवर्धन पाटलांशी बंद दाराआड चर्चा, विवेक कोल्हेंसोबत एकत्र प्रवास, पुण्यात मोठ्या घडामोडी; महायुतीचं टेन्शन वाढलं?

तसंच टेंभी नाक्याच्या इथे सर्वात आधी आनंद दिघे यांनी दहीहंडीची सुरुवात केली. त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात याची व्याप्ती वाढली. त्यामुळे टेंभीनाक्याला गोविंदाची पंढरी म्हणून ओळखली जाते. मुंबईतील प्रत्येक गोविंदा पहिल्यांदा इथे माथा टेकतो आणि नंतर पुढे जातो. मात्र गोविंदांनी सुरक्षेची काळजी घ्यावी. हा साहसी खेळ आहे त्यामुळे कोणीही सेफ्टी जॅकेट घातल्याशिवाय दहीहंडी फोडण्यासाठी येऊ नये, असं आवाहनही शिंदे यांची केले. या कार्यक्रमाला बॉलीवूड स्टार गोविंदा, जॅकी श्रॉफ, सुनील शेट्टी, आणि मराठी अभिनेता प्रकाश ओक यांच्यासह खासदार नरेश म्हस्के उपस्थित होते.

CM Eknath Shinde
Chhatrapati Shivaji Maharaj Statue: सरकारने स्वतः माफी मागून पायउतार व्हावे, मालवणच्या घटनेनंतर काँग्रेसची मागणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com